advertisement

काँग्रेसच्या तोंडचा घास पळवला, भाजपने ऐनवेळी डाव टाकला, वंचितची पडद्याआडून मदत, चंद्रपुरात काय घडलं?

Last Updated:

Chandrapur Mahanagar Palika Mayor News:  चंद्रपूर महानगरपालिकेतून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. इथं भाजपच्या संगिता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली आहे.

News18
News18
Chandrapur Mahanagar Palika Mayor News:  चंद्रपूर महानगरपालिकेतून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. इथं भाजपच्या संगिता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. असं असूनही भाजपनं काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावली आहे. ठाकरे गटाच्या पाठिंब्यानं चंद्रपुरात भाजपचा झेंडा फडकवला आहे. काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट आणि नेत्यांमधील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे.
महापौर पदाच्या निवडणुकीत संगिता खांडेकर यांना ३२ मतं पडली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मतं पडली. अवघ्या एका मतामुळे इथं सत्तेची समीकरणं बदलली आहेत. चंद्रपुरात महानगर पालिकेच्या एकूण ६६ जागा आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी ३४ संख्याबळाची गरज होती. असं असताना वंचित आणि एमआयएमचे नगरसेवक महापौर निवडीच्या वेळी गैरहजर राहिले. साहजिकच यामुळे बहुमताचा आकडा कमी झाला. परिणामी भाजपनं इथं बाजी मारली असून संगिता खांडेकर महापौरपदी निवडून आल्या आहेत.
advertisement

काँग्रेस उमेदवारास ३१ मते, संगीता खांडेकरांना ३२ मते

भाजपने ठाकरे सेनेला सोबत घेऊन चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. ठाकरे सेनेने भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या वडेट्टीवार-धानोरकर गटाने मतभेद विसरून तसेच ठामपणे भूमिका घेऊन महापौरपदाची निवडणूक लढविण्याचे ठरवले. प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास ३१ मते मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या संगीता खांडेकरांना ३२ मते मिळाली. एका मताने भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदाच्या खुर्चीत विराजमान झाल्या.
advertisement

सत्तेच्या वाटाघाटीकरिता काँग्रेसची दिल्लीत चर्चा, तोपर्यंत इकडे भाजपने डाव साधला

चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले खरे. पण काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाचा मोठा फटका बसला. धानोरकर-वडेट्टीवार यांच्यात कमालीचे वाद आहेत. निवडणुकीनंतरही हा वाद शांत झाला नाही. त्यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी उभय नेत्यांना दिल्लीला बोलावून घेतले. दिल्लीतील बैठकीत सत्तावाटपावर तोडगा काढण्यात आला. परंतु तोवर इकडे भारतीय जनता पक्षाने ठाकरे सेनेशी बोलून सत्तावाटपाच्या समीकरणात थेट महापौरपद देण्याची बोलणी करून सेनेला आपल्या बाजूने वळवले. त्यामुळे जे राज्यात २०१९ ला जमले नाही ते भाजप आमदार किशोर जोरगेवार, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घडवून आणले.
advertisement

चंद्रपुरातील घडामोडींवर अंबादास दानवे काय म्हणाले?

अंबादास दानवे म्हणाले की, अद्याप याबाबत कोणतीही माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. मी माहिती घेऊन कळवतो. तो स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांनी माझ्यापर्यंत बोलण्याचा प्रश्न येत नव्हता. मात्र त्यांचं वरिष्ठांशी बोलणं झालं असेल. पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय झाला असेल असंही यावेळी आंबादास दानवे म्हणाले.
चंद्रपूर महानगरपालिका निकाल २०२६ (एकूण जागा: ६६)
advertisement
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)२७
भारतीय जनता पक्ष (BJP)२३
शिवसेना (UBT)०६
शेतकरी कामगार पक्ष (PWP)०३
वंचित बहुजन आघाडी (VBA)०२
अपक्ष (Independents)०२
(MIM, BSP, SHS-शिंदे)प्रत्येकी १
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसच्या तोंडचा घास पळवला, भाजपने ऐनवेळी डाव टाकला, वंचितची पडद्याआडून मदत, चंद्रपुरात काय घडलं?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement