advertisement

त्या सुंदर टेकडीच्या जवळ जाण्याचा मोह जीवावर बेतला; पुण्यात MPSC करणाऱ्या प्रज्वलसोबत लोणावळ्यात भयंकर घडलं

Last Updated:

प्रवासादरम्यान नाश्ता करण्यासाठी सर्वजण लोणावळ्यात थांबले होते. यावेळी "टेकडीवरून फिरून येतो" असं सांगून प्रज्वल आणि त्याचा मावसभाऊ बाजूला गेले.

(टेकडीचा फोटो AI Image)
(टेकडीचा फोटो AI Image)
पुणे : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यामध्ये राहून एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रज्वल वसंत गिरी (वय २६) या तरुणाचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात आणि पुणे शैक्षणिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. प्रज्वल हा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी होता.
नेमकी घटना काय?
प्रज्वल रविवारी आपल्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईहून पुण्याकडे येत होता. प्रवासादरम्यान नाश्ता करण्यासाठी सर्वजण लोणावळ्यात थांबले होते. यावेळी "टेकडीवरून फिरून येतो" असं सांगून प्रज्वल आणि त्याचा मावसभाऊ बाजूला गेले. मात्र, टेकडीवर फिरत असताना अचानक पाय घसरला आणि प्रज्वल थेट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
व्याख्याते वसंत गिरी यांचा एकुलता एक मुलगा
प्रज्वल हा मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते आणि 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या एकपात्री प्रयोगाचे ५०० हून अधिक सादरीकरण करणारे प्रा. वसंत गिरी यांचा एकुलता एक मुलगा होता. प्रज्वल पुण्यात बीएड (B.Ed) करत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने गिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका उमद्या तरुणाच्या अशा मृत्यूने पर्यटनाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
त्या सुंदर टेकडीच्या जवळ जाण्याचा मोह जीवावर बेतला; पुण्यात MPSC करणाऱ्या प्रज्वलसोबत लोणावळ्यात भयंकर घडलं
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement