Central Railway : कसारा फास्ट ट्रेन आता दिव्याला थांबणार नाही?;नेमकं कारण काय?
Last Updated:
Diva Railway Station : कसारा फास्ट लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता या लोकलमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
ठाणे : दिवा प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता कसारा फास्ट लोकलचा दिवा थांबा कायम स्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे. दिवा थांबा बंद झाल्यास काही प्रवाशांना दिलासा मिळणार तर काहीना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
कसारा फास्ट ट्रेन आता दिव्याला थांबणार नाही?
दिवा रेल्वे स्थानकात कसारा आणि कर्जत मार्गावरील जलद लोकलला थांबा दिल्याने प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली असून यामुळे रोज वादाचे प्रकार घडत आहेत. दिव्यातील प्रवासी आणि कसारा-कर्जत भागातून येणारे प्रवासी यांच्यात लोकलमध्ये चढताना आणि उतरताना सतत वाद होत असल्याचे दिसत आहे. काही वेळा शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत पोहोचत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
advertisement
कसारा आणि कर्जत मार्गावरील जलद लोकल या आधीच अत्यंत गर्दीच्या असतात. त्यातच दिवा स्थानकात थांबा दिल्याने या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढत आहेत. विशेषतहा दिवा आणि ठाणे या दोन्ही स्थानकांवर एकाच बाजूला दरवाजे येत असल्याने ठाणे स्थानकात उतरणे अनेक प्रवाशांसाठी कठीण बनले आहे.
या परिस्थितीमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा जीव धोक्यात घालून लोकलमधून उतरावे लागत असल्याचे प्रवासी सांगत आहेत.
advertisement
वाढत्या गर्दीमुळे कसारा प्रवासी आक्रमक
यामुळे कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनने दिवा स्थानकातील कसारा जलद लोकलचा थांबा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष जगदीश धनगर आणि सचिव उमेश विशे यांनी मध्य रेल्वेला निवेदन देत भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते असा इशारा दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 11:43 AM IST







