दमट हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सध्या गहू पिकांवर फुफुंदी मावा रोग झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. फुफुंदी मावा रोगामुळे दाणे हलके होतात आणि दाण्याची गुणवत्ता कमी होते.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात फेब्रुवारीत ढगाळ आणि दमट वातावरण जाणवत आहे. या वातावरणामुळे सध्या गहू पिकांवर फुफुंदी मावा रोग झपाट्याने पसरण्याची शक्यता आहे. फुफुंदी मावा रोगामुळे दाणे हलके होतात आणि दाण्याची गुणवत्ता कमी होते. याशिवाय करपा रोग पानांवर पिवळी आणि तपकिरी डागे निर्माण करतो. करपा रोगामुळे पिकाची वाढ मंदावते आणि उत्पादन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी उपाययोजना न केल्यास नुकसान जास्त होऊ शकते. त्यामुळे चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी नेमकं काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
फुफुंदी नेमकं काय?
फुफुंदी मावा या रोगामुळे गव्हाच्या कणसातील दाणे पूर्ण विकसित होत नाहीत. त्यामुळे दाणे हलके राहतात, उत्पादन घटते तसेच दाण्याची गुणवत्ता कमी होते. दुसरीकडे करपा रोगामुळे पानांवर पिवळसर व तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया मंदावते आणि पिकाची वाढ खुंटते. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. सध्या वातावरण दमट असल्याने हे रोग झपाट्याने पसरण्याचा धोका अधिक आहे.
advertisement
फुफुंदी रोगावर उपाययोजना काय
कृषी तज्ज्ञांच्या मते, रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच त्वरित योग्य औषधांची फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी व्यवस्थापन योग्य ठेवावे, शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगग्रस्त पाने व झाडांचे अवशेष काढून नष्ट करावेत, जेणेकरून रोगाचा प्रसार थांबवता येईल. संतुलित खतांचा वापर करणे, शिफारस केलेल्या औषधांचीच मात्रा वापरणे आणि फवारणी करताना हवामान कोरडे असण्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
गहू पिकाची काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
सध्याच्या हवामान स्थितीत गहू पिकावर करपा आणि फुफुंदी रोगांचा धोका कायम असल्याने शेतकऱ्यांनी दुर्लक्ष न करता वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. वेळेवर काळजी, योग्य फवारणी आणि शेत व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपल्या गहू पिकाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 10:59 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
दमट हवामानाचा परिणाम, गहू पिकांवर फुफुंदी मावा रोगाचा प्रदुर्भाव? असं करा व्यवस्थापन






