advertisement

धक्कादायक! एक गुंठा जागेसाठी भाऊच जीवावर उठला! सासवडमध्ये तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार

Last Updated:

आरोपी पृथ्वीराज राठोड हा वारंवार फोन करून ती जागा आपल्या नावावर करून देण्यासाठी विकीला धमकावत होता. जागा नावावर न केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.

भाऊच जीवावर उठला (AI Image)
भाऊच जीवावर उठला (AI Image)
पुणे : पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील गोळीबाराची घटना ताजी असतानाच, आता ऊदाचीवाडी येथे जमिनीच्या वादातून एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एक गुंठा जमिनीच्या तुकड्यासाठी मावसभाऊच जिवावर उठल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र या घटनेने नात्यातील क्रूरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
नेमका वाद काय?
फिर्यादी विकी मुरलीधर रजपूत (वय ३०, सध्या रा. ऊदाचीवाडी) यांची भोसे चाकण आणि वाकड परिसरात एक गुंठा जमीन आहे. या जागेवरून त्यांचे मावसभाऊ पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड आणि काका उत्तरसिंग रामकुमार राठोड यांच्याशी दीर्घकाळापासून वाद सुरू होता. विकी हे पूर्वी चाकण येथे वडापावचा व्यवसाय करायचे. मात्र, मावसभाऊ आणि काका यांच्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून ते गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या आईकडे ऊदाचीवाडी येथे राहण्यास आले होते.
advertisement
धमक्यांचे रूपांतर गोळीबारात
आरोपी पृथ्वीराज राठोड हा वारंवार फोन करून ती जागा आपल्या नावावर करून देण्यासाठी विकीला धमकावत होता. जागा नावावर न केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. याच रागातून आरोपीने ऊदाचीवाडी येथे येऊन विकीवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. सुदैवाने गोळीचा नेम चुकला आणि विकी थोडक्यात बचावला.
सासवड पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी विकी रजपूत यानी सासवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पृथ्वीराज राठोड आणि उत्तरसिंग राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पुरंदर तालुक्यात सातत्याने होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! एक गुंठा जागेसाठी भाऊच जीवावर उठला! सासवडमध्ये तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement