advertisement

Mumbai News : हुशारी नडली, वेश पालटण्यात होता पटाईत; पण पायातील एका गोष्टीने उघड केलं चोराच पितळ

Last Updated:

Mumbai Crime : आजपर्यंत अनेक चोरीच्या घटनांमध्ये गुन्हेगाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र सध्या नवी मुंबई आणि मुंबईतील एका चोरीला अटक कशा प्रकारे झाली तो विषय चर्चेत आलेला आहे.

High profile serial thief arrested in Mumbai
High profile serial thief arrested in Mumbai
मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका हाय-प्रोफाइल सिरीयल चोराला अटक केली आहे.
वेश पालटण्यात होता पटाईत
विशेष म्हणजे आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी अत्यंत हुशारीने कपडे, हेल्मेट, बॅग आणि वाहन बदलत होता. मात्र त्याच्या एका सवयीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
मोहन विठ्ठल कोकाटे (वय 49) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील सायन परिसरात वास्तव्यास आहे. पोलिसांनी तब्बल 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. प्रत्येक चोरीनंतर तो वेगवेगळ्या पद्धतीने वेशभूषा बदलत होता, त्यामुळे त्याची खरी ओळख पटवणे आव्हानात्मक ठरत होते.
advertisement
अखेर 'या' गोष्टीने चोराचा घात झाला
मात्र प्रत्येक चोरीच्या वेळी तो एकाच प्रकारचे शूज वापरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याच शूजमुळे आरोपीची ओळख पटली आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. पोलिस तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोकाटेचे कुटुंब उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित असल्याची माहिती मिळाली असूनही त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
advertisement
आरोपीला वाईट सवयींचे व्यसन लागले होते त्यातूनच चोरीचे प्रकार वाढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिस आरोपीकडून आणखी चोरीच्या घटनांचा तपास करत असून त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai News : हुशारी नडली, वेश पालटण्यात होता पटाईत; पण पायातील एका गोष्टीने उघड केलं चोराच पितळ
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement