advertisement

Khed Zilla Parishad Result : खेडमध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंची लेक आघाडीवर

Last Updated:

अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक प्रचाराचा नूर एकदम पालटून गेला होता. मोठ्या प्रचारसभेपेक्षा उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यास सुरुवात केली

News18
News18
पुणे :   खेड व तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे निकाल समोर आले आहे. मतदारांमध्ये स्पष्ट बदल जाणवू लागला आहे. जनतेशी कोणतीही नाळ नसलेले व विकासाचा ठोस आराखडा नसलेले काही धनदांडगे उमेदवार पैशांच्या जोरावर निवडून येण्याचा प्रयत्न करीत असले, तरी मतदार अशा प्रवृत्तींना नाकारण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गण आहेत .
मतदानाचे सुरूवातीचे कल हाती आले असून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया सुधीर मुंगसे आघाडीवर आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक प्रचाराचा नूर एकदम पालटून गेला होता. मोठ्या प्रचारसभेपेक्षा उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देण्यास सुरुवात केली. खेडमध्ये सात गट १४ गण आहेत.
राजकीय पक्ष फुटीनंतर तालुक्यातील नेतेही पक्षाच्या विचारधारेप्रमाणे विभागले आहेत. सद्य:स्थितीत खेड तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार, उद्धवसेना, शिंदेसेने, भाजप, काँग्रेस, मनसे तसेच इतर पक्षांकडून निवडणूक लढवली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Khed Zilla Parishad Result : खेडमध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंची लेक आघाडीवर
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement