advertisement

जत जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : जत तालुक्यात कुणाची हवा? निकाल लागला आता सत्ता कुणाची?

Last Updated:

Sangli Jat ZP election result 2026 : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाने एकत्रित येत भाजपला रोखण्यासाठी मोठी व्यूहरचना आखली आहे.

Sangli Jat  ZP  election result 2026 bjp
Sangli Jat ZP election result 2026 bjp
Sangli Jat ZP election result 2026 : यंदाच्या निवडणुकीत जतमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय महाविकास आघाडी असा थेट आणि मोठा सामना पाहायला मिळत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी पूर्ण जोर लावला असला, तरी काँग्रेसने आपल्या जुन्या बालेकिल्ल्यात पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाने एकत्रित येत भाजपला रोखण्यासाठी मोठी व्यूहरचना आखली आहे.
जाडर बोबलाद सारख्या हाय व्होल्टेज गटात अत्यंत लक्षवेधी लढत होत आहे. येथे जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींच्या पत्नी सावित्री रवी-पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि भागश्री संजय तेली (भाजप) यांच्यात काट्याची टक्कर आहे. या दोन प्रबळ उमेदवारांच्या संघर्षामुळे या गटातील निकाल नेमका काय लागतो, याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.
आजच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने जतमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. तालुक्यातील 9 गटांत झालेल्या मतदानाचा कौल पाहता, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत जतच्या मिनी मंत्रालयाचा नवा कारभारी कोण असेल, याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल आणि विजयाचा गुलाल कोणाच्या वाट्याला येतो, हे समजेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
जत जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : जत तालुक्यात कुणाची हवा? निकाल लागला आता सत्ता कुणाची?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement