advertisement

Dharashiv Zilla Parishad Election: 30 मिनिटांमध्ये ठाकरे गटाचा जलवा, भगवा फडकला: ओमराजेंनी करून दाखवलं

Last Updated:

धाराशिवमध्ये एकीकडे तिरंगा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण मजमोजणीच्या अवघ्या ३० मिनिटांमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली आहे. 

News18
News18
धाराशीव : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. धाराशिवमध्ये एकीकडे तिरंगा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण मजमोजणीच्या अवघ्या ३० मिनिटांमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली आहे.  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवत विजयी खातं उघडलं आहे.
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. आधी टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मुख्य ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या ३० मिनिटांमध्ये निकाल फिरला आहे.  धाराशिव तालुक्यातील ढोकी पंचायत समितीमध्ये  उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विजयी झाले आहे. अमर नाना समुद्रे हे विजयी झाली आहे. अमर नाना समुद्रे ४१८ मत मिळवून विरोधकांचा पराभव केला आहे.  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पंचायत समिती निवडणुकीत विजयी खातं उघडलं आहे.
advertisement
तर दुसरीकडे  कळंब तालुक्यातील ईटकुर गटातून शिवसेनेचे उमेदवार आनंद पिंटू लंगडे विजयी झाले आहे. तर पंचायत समितीच्या दोन्ही जागा महायुतीच्या विजय झाला आहे.
जिल्हा परिषदेसाठी किती ठिकाणी निवडणूक? 
धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा आणि उमरगा इथं पंचायत समितीची निवडणूक होत आहे. तर जिल्हा परिषदेसाठी एकूण ५५ जागा आहे. पंचायत समिती गण अर्थात पंचायत समित्यांसााठी ११० जागांसाठी मतमोजणी होणार आहे. धाराशिवमध्ये सर्वाधिका ९६७ उमेदवार निवणुकीच्या रिंगणात आहे.
advertisement
अर्चना पाटील Vs ओमराजे निंबाळकर
दरम्यान, धाराशिव लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट घेतल्यानंतर अर्चना पाटील यांचा दारुण पराभव खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यानंतर आता अर्चना पाटील या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांनी यावेळी मात्र जिल्हा परिषदेत निवडणूक लढवत आहे.   तेर गटात तिरंगी लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युती प्रदेशाध्यक्ष सलगर आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विश्वासू मुन्ना खटावकर यांच्या पत्नी कीर्तीमाला खटावकर यांच्यात ही लढत पाहायला मिळणार आहे. वरतून ही तिरंगी जरी लढत वाटत असली तरी इथं प्रतिष्ठा भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची लागली आहे.
advertisement
वाढीव मताचा फटका कुणाला बसणार?
तेरमध्ये यंदा 70 टक्के एवढे मतदान झाल्यानं गेल्या वेळेस पेक्षा मताचा टाका थोडा वाढल्याने याचा फटका कोणाला बसेल याची उत्सुकता लागली आहे. अर्चना पाटील या जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्या तरी त्या जिल्हा परिषदेची जागा ओपन महिलांना आरक्षित असल्याने त्या अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून देखील रिंगणात उभा असून त्यांचा प्रचार ही तसाच करण्यात आला आहे, त्यांच्या या दावेदारीवरून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाची काही काळ राजकीय तणाव पाहायला मिळाला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Zilla Parishad Election: 30 मिनिटांमध्ये ठाकरे गटाचा जलवा, भगवा फडकला: ओमराजेंनी करून दाखवलं
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement