मुंबई : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 1 डिसेंबर 2025 रोजी सोयाबीनला चांगली आवक होत असून दरांमध्ये ठिकठिकाणी मोठा फरक पाहायला मिळत आहे. पिवळ्या, लोकल आणि हायब्रीड या तिन्ही प्रकारांमध्ये दर 3,000 रुपयांपासून थेट 5,300 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. काही भागात आवक कमी असल्याने दरात वाढ दिसत आहे, तर काही बाजारात आवक जास्त असल्याने सरासरी दर स्थिर आहेत.
advertisement
लासलगाव-विंचूर येथे 520 क्विंटल आवक झाली असून किमान दर 3,000 रुपये तर जास्तीत जास्त दर 4,511 रुपये मिळाला. सरासरी दर 4,475 रुपये नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि माजलगाव येथेही 4,400 रुपयांच्या आसपासचा सरासरी भाव मिळाला. माजलगावमध्ये 1,290 क्विंटलची आवक असून 4,491 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. चंद्रपूर, सिन्नर आणि सेलू येथे सरासरी दर 4,000 ते 4,400 रुपये दरम्यान राहिला.
सर्वाधिक दर कुठे मिळाला?
सगळ्यात जास्त दर 5328 रुपये कोरेगाव बाजार समितीत नोंदवला गेला. येथे आवक तब्बल 5431 क्विंटल झाली असून सर्वच व्यवहार एका दराने झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील बाजारात आवक प्रचंड असून 15,253 क्विंटल सोयाबीन बाजारात आले. पिवळ्या जातीस 4,480 ते 4,700 रुपयांचा दर मिळाला व सरासरी दर 4,500 रुपये होता. जालना, अकोला, बीड, वाशीम, धामणगाव रेल्वे आणि हिंगोली येथेही पिवळ्या सोयाबीनला 4,300 ते 4,700 रुपयांचा दर मिळत आहे.
अमरावतीमध्ये आवक 6,885 क्विंटल इतकी मोठी असून लोकल सोयाबीनचा सरासरी दर 4,175 रुपये नोंदवला. नागपूरमध्ये 3,990 तर अमळनेरमध्ये 4,295 रुपये सरासरी दर मिळाला. कोपरगाव, ताडकळस, लासलगाव-निफाड येथेही दर 4,300 ते 4,450 रुपयांच्या दरम्यान आहे. सोलापूर बाजारात लोकल सोयाबीनचा सर्वाधिक भाव 4,635 रुपये मिळाला.
काही बाजारांत आज अपेक्षित वाढ दिसली. जसे की सिंदी (सेलू) येथे जास्तीत जास्त दर 4,600 रुपये, तर उमरखेड येथे 4,650 रुपयेचा दर मिळाला. मुखेड आणि आखाडाबाळापूर येथे सरासरी दर 4,500 रुपयांच्या आसपास होता. मंगरुळपीरमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असून जास्तीत जास्त दर थेट 5,375 रुपये मिळाला आहे. हे आजच्या दिवसातील सर्वात उच्चांकी दरांपैकी एक आहे.
तर काही बाजारात आवक कमी असल्याने दरात स्थिरता आहे. जळगावमध्ये 20 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,350 रुपये, तर पाचोरा येथे आवक 300 क्विंटल आणि सरासरी दर 4,000 रुपयांवर स्थिर आहे. घाटंजी, राळेगाव, राजूरा, वणी आणि बाभुळगाव येथेही दर 4,000 ते 4,300 रुपयांच्या दरम्यान आहेत.
एकूणच, 1 डिसेंबर रोजी सोयाबीनचे दर बहुतेक बाजारात 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान राहिले. काही प्रमुख बाजारात 5,300 रुपयांपर्यंत वाढ पाहायला मिळाली. पुढील काही दिवसांत आवक वाढली तर दर थोडे स्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
