advertisement

APMC Market: रविवारी कांदा, कपाशीचे दर घसरले, सोयाबीन, तुरीला किती मिळाला भाव?

Last Updated:

APMC Market: कृषी मार्केटमध्ये रविवारी मोठ्य घडामोडी दिसल्या. कपाशी, कांदा, सोयाबीन आणि तूर या पिकांचे भाव जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: रविवारी कांदा, कपाशीचे दर घसरले, सोयाबीन, तुरीला किती मिळाला भाव?

अमरावती: राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये 25 जानेवारी रोजी मोठ्या उलाढाली दिसल्या. प्रमुख पिकांच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. कपाशी, कांदा, सोयाबीन आणि तूर या सर्वच पिकांच्या बाजारभावात शनिवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत घट झाल्याचं दिसून येत आहे. तसेच आवक देखील कमी झाली आहे. प्रमुख शेतमालाची आवक किती झाली? भाव किती मिळाला? जाणून घेऊ.
कपाशीचे दर घसरले
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या अहवालानुसार, आज राज्यातील कृषी बाजारात कपाशीची खूप कमी आवक झाली. अमरावती कृषी बाजार समितीत 300 क्विंटल कपाशीची नोंद झाली. या बाजारात कपाशीला किमान 6 हजार 300 ते कमाल 6 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. शनिवारी मिळालेल्या उच्च दरांच्या तुलनेत आज कपाशीच्या बाजारभावात लक्षणीय घट दिसून आली आहे.
advertisement
कांद्याच्या भावात नरमाई
आज राज्यातील विविध कृषी बाजारांत कांद्याची एकूण 1 लाख 42 हजार 652 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. यामध्ये अहिल्यानगर बाजारात 83 हजार 283 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. या ठिकाणी कांद्याला किमान 200 ते कमाल 1 हजार 900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुणे बाजारात मात्र लाल कांद्याला 2 हजार 250 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला. शनिवारी नोंदवलेल्या उच्चांकी दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
advertisement
सोयाबीनचे दरही खाली
आज राज्यातील कृषी बाजारांत सोयाबीनची एकूण 967 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये लातूर बाजारात 861 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. येथे सोयाबीनला किमान 4 हजार 900 ते कमाल 5 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर पिवळ्या सोयाबीनला 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा उच्च दर मिळाल्याचं दिसून आलं. मात्र, मागील दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या बाजारभावात घट झाली आहे.
advertisement
तुरीच्या दरात घट कायम
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये तुरीची एकूण 725 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. यापैकी लातूर बाजारात 362 क्विंटल लाल तुरीची सर्वाधिक आवक झाली. या बाजारात तुरीला किमान 7 हजार 500 ते कमाल 7 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. लातूर बाजारातच तुरीला आज 8 हजार 340 रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला असला तरी, शनिवारी नोंदवलेल्या दरांच्या तुलनेत एकूणच तुरीच्या दरात घट झाल्याचं स्पष्ट होत आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: रविवारी कांदा, कपाशीचे दर घसरले, सोयाबीन, तुरीला किती मिळाला भाव?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement