advertisement

Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, प्रजासत्ताक दिनी पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात कुठं बरसणार?

Last Updated:
Weather Alert: प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांत मोठे बदल जाणवत आहेत. ढगाळ वातावरण कायम राहिल्यामुळे सकाळी धुके, तर दुपारनंतर उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडीची तीव्रता कमी झाली असून, राज्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी राज्यातील हवामान कसं राहणार आहे? पाहुयात.

2/7
कोकण विभागात हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत सकाळच्या वेळेत धुक्याचं प्रमाण जाणवू शकतं, तर दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची कोणतीही शक्यता नसून, नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील.

3/7
उत्तर महाराष्ट्रात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून, काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे कमाल तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

4/7
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहणार आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळी धुक्याची शक्यता असून, त्यानंतर दिवसभर हवामान कोरडं राहील. येथे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी सौम्य गारवा आणि दुपारनंतर उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.

5/7
मराठवाडा विभागातही सकाळच्या वेळेत धुकं आणि त्यानंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी धुके तर दिवसा ढगाळ वातावरण जाणवू शकते. येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहील.

6/7
विदर्भात सकाळच्या वेळेत हवामान प्रामुख्याने निरभ्र राहील, मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.

7/7
दरम्यान, जानेवारीच्या उत्तरार्धात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा कडाका कमी होत असून कमाल आणि कमान तापमानात वाढ होत आहे. काही भागात गारठा, काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस तर काही ठिकाणी वाढत्या तापमानामुळे उकाडा अशी स्थिती आहे. याच विचित्र हवामान स्थितीमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
दरम्यान, जानेवारीच्या उत्तरार्धात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा कडाका कमी होत असून कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. काही भागात गारठा, काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस तर काही ठिकाणी वाढत्या तापमानामुळे उकाडा अशी स्थिती आहे. याच विचित्र हवामान स्थितीमुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement