TRENDING:

सोयाबीनच्या दरात तेजी कायम! भाव आणखी वाढणार? आजचे मार्केट काय?

Last Updated:

Soyabean Market Update : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये मागील दोन दिवसांत मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये मागील दोन दिवसांत मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दरांनी ६ हजार रुपयांचा टप्पा गाठला असताना, तर काही बाजारांमध्ये कमी आवक आणि दर्जावर अवलंबून दर दबावात दिसून येत आहेत. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजीच्या उपलब्ध माहितीनुसार सोयाबीन बाजारभावाची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
soybean market
soybean market
advertisement

राज्यात सोयाबीनची आवक कशी आहे?

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक समाधानकारक असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माल दाखल झाला आहे. अमरावती बाजार समितीत तब्बल ५१४८ क्विंटल, जालना येथे ५३८१ क्विंटल, जळगाव (लोकल) येथे ५२३० क्विंटल तर अकोला बाजारात ५२७१ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवण्यात आली आहे. यामुळे काही बाजारांमध्ये दरांवर दबाव दिसत असला तरी मागणी चांगली असल्याने दर टिकून आहेत.

advertisement

६ हजारांपर्यंत पोहोचलेले दर

जालना बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला ६००० रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला आहे. तसेच वाशीम बाजारात कमाल दर ६३२० रुपये, बाभुळगाव येथे ६०५५ रुपये तर सिंदी (सेलू) येथे ५३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत व्यवहार झाले आहेत. दर्जेदार आणि कोरड्या मालाला व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.

advertisement

मध्यम दरांचा कल कुठे दिसतो?

राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सोयाबीनचा सर्वसाधारण दर ५२०० ते ५५०० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. जळकोट येथे ५२२१ रुपये, बुलढाणा येथे ५०३७ रुपये, नागपूर येथे ५१८३ रुपये, कोपरगाव येथे ५३२१ रुपये तर लासलगाव-निफाड येथे ५३९० रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर नोंदवण्यात आला आहे. सोलापूर लोकल सोयाबीनला ५४४० रुपये दर मिळाला आहे.

advertisement

काही बाजारात दरांवर दबाव

काही ठिकाणी मात्र दर तुलनेने कमी राहिले आहेत. आर्वी बाजारात किमान दर ३५०० रुपये तर सर्वसाधारण दर ४००० रुपये राहिला आहे. मुखेड (मुक्रमाबाद) येथे सरासरी दर ४०५० रुपये, चंद्रपूर येथे ५२०० रुपये, पाचोरा येथे ४५५१ रुपये तर उमरखेड परिसरात ४८०० रुपये दर मिळाला आहे. कमी दर्जाचा, ओलसर किंवा साठवणुकीतील माल असल्यास दर घटताना दिसत आहेत.

advertisement

शेतकऱ्यांसाठी काय संकेत?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा रथसप्तमीला सुवर्णयोग! ‘त्या’ इच्छा होतील पूर्ण, का करतात सूर्यदेवाची पूजा?
सर्व पहा

सध्या सोयाबीन बाजारात चढ-उताराचे वातावरण असून दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत आहे. येत्या काळात तेलबियांची मागणी, साठेबाजी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती याचा परिणाम दरांवर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईत विक्री न करता स्थानिक बाजारभाव, आवक आणि दर्जाचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीनच्या दरात तेजी कायम! भाव आणखी वाढणार? आजचे मार्केट काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल