हिंदू धर्मात रथसप्तमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाची आराधना करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 19 जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात झाली आहे. हा महिना सूर्यदेवाच्या पूजेसाठी पवित्र मानला जातो. याच महिन्यात रथसप्तमी येते. माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते.
Ratha Saptami 2026: रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
advertisement
धार्मिक मान्यतेनुसार, सृष्टीच्या आरंभी याच दिवशी सूर्यकिरण पृथ्वीवर पडले. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याचा प्रकटदिन किंवा सूर्य जयंती असेही म्हटले जाते. यंदा सप्तमी तिथी 24 जानेवारीला मध्यरात्री 12 वाजून 49 मिनिटांनी सुरू झालीय आणि 25 जानेवारीला रात्री 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत असणार आहे.
काय आहे कथा?
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता, अशी श्रद्धा आहे. अदितीच्या तपश्चर्येमुळे तेजस्वी सूर्यदेव प्रकट झाले आणि त्यांच्या प्रकाशाने संपूर्ण सृष्टी उजळून निघाली, असे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे.
या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात?
एका पौराणिक कथेनुसार, स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल? म्हणून त्यांनी देवाला विचारले. तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले, त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात.





