RathSaptami 2026: सूर्य उपासनेतून आरोग्य आणि यशाची प्राप्ती! रथसप्तमीला वेळात वेळ काढून म्हणावे असे राशीनुसार सूर्यमंत्र
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
RathSaptami 2026: सूर्यदेवाला समर्पित असलेला रथ सप्तमीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला अचला सप्तमी, सूर्य जयंती आणि माघी सप्तमी अशा विविध नावांनी ओळखले जाते. रथसप्तमीला दिवसभरात आपल्या वेळेनुसार एकदा तरी आपल्या राशीनुसार सूर्य मंत्राचा जप करावा, यामुळे..
मुंबई : सनातन धर्मात सूर्यदेवाला प्रत्यक्ष देवता मानले जाते. रविवारी सूर्याची पूजा करण्याची धार्मिक परंपरा आहे, ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा असून तो ऊर्जा, आरोग्य, आत्मा आणि पित्याचा कारक आहे. सूर्याशिवाय या पृथ्वीवर जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. याच सूर्यदेवाला समर्पित असलेला रथ सप्तमीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला अचला सप्तमी, सूर्य जयंती आणि माघी सप्तमी अशा विविध नावांनी ओळखले जाते. रथसप्तमीला दिवसभरात आपल्या वेळेनुसार एकदा तरी आपल्या राशीनुसार सूर्य मंत्राचा जप करावा, यामुळे शुभ परिणाम कामात मिळू लागतात.
रथ सप्तमीचे धार्मिक महत्त्व - रथ सप्तमीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, याच तिथीला सूर्यदेव आपल्या दिव्य रथावर स्वार होऊन पहिल्यांदा पृथ्वीवर प्रकट झाले होते. सूर्याची पहिली किरणे याच दिवशी पृथ्वीवर पडली होती, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
रथ सप्तमी 2026 तिथी आणि वेळ - पंचांगानुसार, माघ शुक्ल सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026, शनिवारी रात्री 12:40 वाजता सुरू होईल आणि 25 जानेवारी 2026, रविवारी रात्री 11:11 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 25 जानेवारी 2026, रविवारी रथ सप्तमी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
सूर्य पूजनाचे फायदे - रथ सप्तमीच्या दिवशी जो भक्त खऱ्या मनाने सूर्यदेवाची पूजा करतो, त्याच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होते. त्याला उत्तम आरोग्य, धन आणि समाजात मानसन्मान प्राप्त होतो. सूर्य उपासनेमुळे शारीरिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन बुद्धी आणि तेजात वाढ होते. ज्यांच्या कुंडलीत सूर्य दोष आहे, त्यांनी या दिवशी विशेष पूजा केल्यास त्यांना शांती लाभते.
advertisement
राशीनुसार सूर्य मंत्राचा जप
मेष राशी - ॐ अचिंताय नम:
वृषभ राशी - ॐ अरुणाय नम:
मिथुन राशी - ॐ आदि-भुताय नम:
कर्क राशी - ॐ वसुप्रदाय नम:
सिंह राशी - ॐ भानवे नम:
कन्या राशी - ॐ शांताय नम:
advertisement
तूळ राशी - ॐ इंद्राय नम:
वृश्चिक राशी - ॐ आदित्याय नम:
धनु राशी - ॐ शर्वाय नम:
मकर राशी - ॐ सहस्त्र किरणाय नम:
कुंभ राशी - ॐ ब्रह्मणे दिवाकर नम:
मीन राशी - ॐ जयिने नम:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 8:07 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
RathSaptami 2026: सूर्य उपासनेतून आरोग्य आणि यशाची प्राप्ती! रथसप्तमीला वेळात वेळ काढून म्हणावे असे राशीनुसार सूर्यमंत्र






