Navpancham Rajyog 2026: फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ‘या’ 4 राशी होतील करोडपती! शुक्र-शनिचा शक्तिशाली योग देईल पैसाच पैसा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: नवीन वर्ष सुरू होऊन पहिला महिना संपत आला आहे, फेब्रुवारीमधील ग्रहांची स्थिती राशीचक्रावर अनोखा प्रभाव दाखवेल. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांची चाल आणि त्यांचे परस्पर संबंध मानवी जीवनावर परिणाम करतात. जेव्हा दोन शुभ ग्रह एका विशिष्ट कोनात येतात, तेव्हा त्यातून तयार होणारे योग सुख, समृद्धी आणि प्रगतीचे संकेत देतात.
advertisement
ज्योतिषीय गणनानुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजून 59 मिनिटांनी गुरु आणि बुध एकमेकांपासून 120 अंशांच्या कोनात म्हणजेच नवपंचम संबंधात असतील. या वेळी गुरु मिथुन राशीत आणि बुध कुंभ राशीत असतील. विशेष म्हणजे कुंभ राशीत बुधासोबत सूर्य, शुक्र आणि राहूची युती देखील असेल, ज्यामुळे या योगाची शक्ती अनेक पटीने वाढणार आहे. या काळात गुरु मिथुन राशीत असून तो 2 जून 2026 पर्यंत याच राशीत राहील. या राजयोगाचा 3 राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे.
advertisement
मीन - साडेसातीचा त्रास सोसत असलेल्या मीन राशीच्या लोकांसाठी गुरु-बुध नवपंचम राजयोग फायदेशीर ठरेल. या काळात परदेश प्रवास, विदेशी संपर्क, आयात-निर्यात आणि आध्यात्मिक प्रगतीचे योग येतील. जे लोक संशोधन, शिक्षण किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी जोडलेले आहेत, त्यांना मोठे यश मिळू शकते. तुमचे खर्च वाढू शकतात, परंतु ते खर्च भविष्यात लाभदायक ठरतील. गुप्त धनप्राप्तीचे संकेत असून तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग करिअर आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल आणि तुमची विचार करण्याची पद्धत अधिक रचनात्मक होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील. तसेच मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते आणि प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल.
advertisement
advertisement
कुंभ राशीच्या पाचव्या भावात गुरु असल्यामुळे शिक्षण, करिअर आणि सर्जनशील कामात यशाचे योग आहेत. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. संतान सुख मिळण्याची शक्यता असून प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







