Pakistan: लग्नाचं मंडप झालं कब्रिस्तान, संगीत सोहळ्यात आत्मघाती हल्ला, 7 जणांचा मृत्यू, 25 रक्ताच्या थारोळ्यात
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लग्नाच्या मंडपातच आत्मघाती हल्ला झाला, या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या मंडपात अनेक जण जखमी झाले.
घरात लग्नसराई असल्याने आनंदाचं वातावरण होतं. पाहुणे आनंदाने नाचत होते आणि नवदाम्पत्याच्या नव्या आयुष्याची स्वप्नं सजवली जात होती. पण कोणाला माहीत होतं की, हा आनंद काही क्षणांचाच सोबती आहे? एका क्षणात सगळा आनंद विरला आणि होत्याचं नव्हतं झालं. लग्नाच्या मंडपात अर्थी उठण्याची वेळ आली. लग्नाच्या मंडपातच आत्मघाती हल्ला झाला, या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या मंडपात अनेक जण जखमी झाले.
जेवण सुरू होतं आणि अचानक 'तो' आला...
उत्तर-पश्चिमी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका लग्नसोहळ्यावर काळाने झडप घातली. एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्याने लग्नाच्या मंडपात स्मशान शांतता पसरली होती. डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील सरकार समर्थक नेते नूर आलम महसूद यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, काही पाहुणे जेवणाचा आनंद घेत होते. तर तरुण मंडळी संगीताच्या तालावर ठेका धरत होती. त्याचवेळी एक संशयास्पद व्यक्ती गर्दीत शिरली आणि काही कळण्याच्या आतच मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
advertisement
हल्ल्यामागे नक्की कोणाचा हात?
स्थानिक पोलीस प्रमुख अदनान खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला जाणीवपूर्वक गर्दीच्या ठिकाणी करण्यात आला. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, या भागात सक्रिय असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेवर संशयाची सुई आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून टीटीपीच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली असून, निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे.
advertisement
रुग्णालयात उपचार सुरू
घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये नूर आलम महसूद यांच्या जवळच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे समजते. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्या घरातून डोली निघणार होती, तिथून आता अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 11:11 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Pakistan: लग्नाचं मंडप झालं कब्रिस्तान, संगीत सोहळ्यात आत्मघाती हल्ला, 7 जणांचा मृत्यू, 25 रक्ताच्या थारोळ्यात








