Shocking: किचनमध्ये शिरला, कुकर उघडला अन्.....; कंळबोलीतील घटनेने सर्वच हादरले; पोलिस तपास सुरु
Last Updated:
Kalamboli News : नवी मुंबईत कळंबोली परिसरात एका घरातून सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीस गेले. घरातील कुकरमध्ये ठेवलेले सोनं अनोळखी इसमाने चोरी केले.
नवी मुंबई : नवी मुंबईतील कळंबोली परिसरात एका घरातून सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेमकी ही चोरी कशी झाली याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चावीने दरवाजा उघडला अन् कुकरमध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास टिंगरे यांच्या घरातील ही चोरी 8 जानेवारी रोजी झाली होती. कैलास टिंगरे यांच्या पत्नीने घरातील किचनमध्ये कुकरमध्ये सोन्याचे गंठण सुरक्षित ठेवले होते. मात्र, अनोळखी व्यक्तीने घराचा दरवाजा चावीने उघडून सोन्याचे गंठण चोरी करून नेले.
याप्रकरणी 21 जानेवारी रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. चोरी झालेल्या सोन्याचे गंठण स्थानिक बाजारात विकले जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
पोलिसांनी नागरिकांना आपल्या घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच घरातील कुठलाही मौल्यवान वस्तू सहज दिसणाऱ्या ठिकाणी ठेवू नयेत असेही सांगितले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. पोलीस तपास करत असून चोरीसाठी वापरलेली चावी किंवा अन्य पुरावे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 11:02 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking: किचनमध्ये शिरला, कुकर उघडला अन्.....; कंळबोलीतील घटनेने सर्वच हादरले; पोलिस तपास सुरु








