advertisement

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; आनंदी वार्ता कोणाला? पुन्हा भाग्याची साथ..

Last Updated:
Weekly Horoscope Marathi: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काही राशींना नशिबाची साथ मिळेल. 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या आठवड्यात ग्रहांची स्थिती विशेष आहे. बुध, शुक्र, मंगळ आणि सूर्य मकर राशीत असतील. केतू सिंह राशीत, राहू कुंभ राशीत आणि शनि मीन राशीत असतील. या आठवड्यात अनेक राशींना नशीबाची साथ मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात. सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींवरील साप्ताहिक परिणाम जाणून घेऊ.
1/6
सिंह साप्ताहिक राशीभविष्य - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून यश आणि शुभता मिळेल. कठीण कामंसुद्धा तुमच्या बुद्धीच्या जोरावर पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असाल तर अपेक्षित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रभावी व्यक्तीमुळे मोठी अडचण सुटेल. ऑफिसमध्ये कामाचं कौतुक होईल आणि पद व प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायासाठीही आठवडा अनुकूल आहे. आर्थिक लाभ मिळेल.
सिंह साप्ताहिक राशीभविष्य - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीपासून यश आणि शुभता मिळेल. कठीण कामंसुद्धा तुमच्या बुद्धीच्या जोरावर पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असाल तर अपेक्षित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रभावी व्यक्तीमुळे मोठी अडचण सुटेल. ऑफिसमध्ये कामाचं कौतुक होईल आणि पद व प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायासाठीही आठवडा अनुकूल आहे. आर्थिक लाभ मिळेल.
advertisement
2/6
सिंह राशीच्या लोकांच्या व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. साठवलेला पैसा वाढेल. आठवड्याच्या शेवटी नोकरी करणाऱ्यांना कामाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. नातेसंबंध चांगले राहतील. भावंडांशी प्रेम आणि विश्वास वाढेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. पालकत्वाचा आनंद मिळू शकतो.भाग्यवान रंग: काळा
भाग्यवान क्रमांक: 9
सिंह राशीच्या लोकांच्या व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. साठवलेला पैसा वाढेल. आठवड्याच्या शेवटी नोकरी करणाऱ्यांना कामाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. नातेसंबंध चांगले राहतील. भावंडांशी प्रेम आणि विश्वास वाढेल. घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. पालकत्वाचा आनंद मिळू शकतो.भाग्यवान रंग: काळाभाग्यवान क्रमांक: 9
advertisement
3/6
कन्या साप्ताहिक राशीभविष्य - कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र फळ देणारा असेल. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाका. आठवड्याच्या सुरुवातीपासून आरोग्य थोडं अशक्त राहू शकतं. कामात उशीर किंवा अडथळे आल्यामुळे मन अस्वस्थ राहील आणि स्वभावात चिडचिड जाणवेल. आरोग्य आणि नातेसंबंध दोन्ही सांभाळावे लागतील. आठवड्याच्या मध्यात मुलांशी मतभेद होऊ शकतात. आरोप किंवा वाद निर्माण होतील असं काही करू नका. आर्थिक व्यवहार आणि खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाचा समतोल साधताना त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा टिकवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. व्यवसाय थोडा मंद राहील. प्रेमप्रकरणात फार दिखावा टाळा, नाहीतर अपमान होऊ शकतो. वैवाहिक जीवनात थोडी खटपट असली तरी परिस्थिती सामान्य राहील.भाग्यवान रंग: नारंगी
भाग्यवान क्रमांक: 4
कन्या साप्ताहिक राशीभविष्य - कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्र फळ देणारा असेल. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाका. आठवड्याच्या सुरुवातीपासून आरोग्य थोडं अशक्त राहू शकतं. कामात उशीर किंवा अडथळे आल्यामुळे मन अस्वस्थ राहील आणि स्वभावात चिडचिड जाणवेल. आरोग्य आणि नातेसंबंध दोन्ही सांभाळावे लागतील. आठवड्याच्या मध्यात मुलांशी मतभेद होऊ शकतात. आरोप किंवा वाद निर्माण होतील असं काही करू नका. आर्थिक व्यवहार आणि खर्चावर नियंत्रण ठेवा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाचा समतोल साधताना त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा टिकवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. व्यवसाय थोडा मंद राहील. प्रेमप्रकरणात फार दिखावा टाळा, नाहीतर अपमान होऊ शकतो. वैवाहिक जीवनात थोडी खटपट असली तरी परिस्थिती सामान्य राहील.भाग्यवान रंग: नारंगीभाग्यवान क्रमांक: 4
advertisement
4/6
तूळ साप्ताहिक राशीभविष्य - तूळ राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ थोडं उशिरा किंवा कमी प्रमाणात मिळू शकतं, त्यामुळे मन निराश होऊ शकतं. कामात अडथळे आणि घरच्यांचा कमी पाठिंबा चिंता वाढवेल. कोणतेही काम करताना शॉर्टकट किंवा नियमभंग टाळा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. व्यवसायात असाल तर जास्त नफ्याच्या अपेक्षेने धोकादायक गुंतवणूक करू नका.
तूळ साप्ताहिक राशीभविष्य - तूळ राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ थोडं उशिरा किंवा कमी प्रमाणात मिळू शकतं, त्यामुळे मन निराश होऊ शकतं. कामात अडथळे आणि घरच्यांचा कमी पाठिंबा चिंता वाढवेल. कोणतेही काम करताना शॉर्टकट किंवा नियमभंग टाळा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. व्यवसायात असाल तर जास्त नफ्याच्या अपेक्षेने धोकादायक गुंतवणूक करू नका.
advertisement
5/6
तूळ - भागीदारीत व्यवसाय करत असाल तर मोठे निर्णय घेण्याआधी हितचिंतकांचा सल्ला घ्या. नोकरी करणाऱ्यांनी आपली कामं स्वतः पूर्ण करावीत आणि भावनेतून निर्णय घेऊ नयेत. नवीन नोकरीत वरिष्ठांचा स्वभाव समजून घेऊन काम करा, नाहीतर सर्वांसमोर सुनावणी होऊ शकते. घरगुती प्रश्न सोडवताना मोठ्यांचा सल्ला घ्या. स्वतःचं आणि वडिलांचं आरोग्य सांभाळा.भाग्यवान रंग: गुलाबी
भाग्यवान क्रमांक: 3
तूळ - भागीदारीत व्यवसाय करत असाल तर मोठे निर्णय घेण्याआधी हितचिंतकांचा सल्ला घ्या. नोकरी करणाऱ्यांनी आपली कामं स्वतः पूर्ण करावीत आणि भावनेतून निर्णय घेऊ नयेत. नवीन नोकरीत वरिष्ठांचा स्वभाव समजून घेऊन काम करा, नाहीतर सर्वांसमोर सुनावणी होऊ शकते. घरगुती प्रश्न सोडवताना मोठ्यांचा सल्ला घ्या. स्वतःचं आणि वडिलांचं आरोग्य सांभाळा.भाग्यवान रंग: गुलाबीभाग्यवान क्रमांक: 3
advertisement
6/6
वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य - या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी धीर न सोडता योग्य दिशेने सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या पहिल्या भागात व्यवसायात अडचणी येऊ शकतात. बाजारातील घसरण आणि स्पर्धकांचा दबाव जाणवेल. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त राहील. या काळात केलेला प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फायद्याचा ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत थोडा दिलासा मिळेल, पण मेहनत सुरूच ठेवावी लागेल. कोणत्याही वादात तडजोड केली नाही तर प्रश्न लांबू शकतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी जुन्या गोष्टी उगाळू नका. प्रेमसंबंधात संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील.भाग्यवान रंग: तपकिरी
भाग्यवान क्रमांक: 6
वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य - या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी धीर न सोडता योग्य दिशेने सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या पहिल्या भागात व्यवसायात अडचणी येऊ शकतात. बाजारातील घसरण आणि स्पर्धकांचा दबाव जाणवेल. खर्च उत्पन्नापेक्षा जास्त राहील. या काळात केलेला प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फायद्याचा ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत थोडा दिलासा मिळेल, पण मेहनत सुरूच ठेवावी लागेल. कोणत्याही वादात तडजोड केली नाही तर प्रश्न लांबू शकतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी जुन्या गोष्टी उगाळू नका. प्रेमसंबंधात संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील.भाग्यवान रंग: तपकिरीभाग्यवान क्रमांक: 6
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement