advertisement

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; शेवटचा आठवडा कसा? मेहनत फळास पण..

Last Updated:
Weekly Horoscope Marathi: जानेवारीच्या या आठवड्यात अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, काही राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या आठवड्यात ग्रहांची स्थिती विशेष आहे, 29 जानेवारी रोजी मंगळ श्रवण नक्षत्रात, 30 जानेवारी रोजी गुरु पुनर्वसु नक्षत्रात आणि 31 जानेवारी रोजी बुध आणि शुक्र धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करतील. बुध, शुक्र, मंगळ आणि सूर्य मकर राशीत राहतील. एकंदरी ग्रहस्थितीनुसार मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
1/7
मेष साप्ताहिक राशीभविष्य - या आठवड्यात मेष राशीच्या लोकांनी “घाई नको, काळजी घेणे” हे सूत्र लक्षात ठेवावं. कुठलेही काम घाईघाईत करू नका आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांनी आठवड्याच्या पहिल्या भागात कामात निष्काळजीपणा टाळावा, नाहीतर वरिष्ठांचा रोष ओढवू शकतो. या काळात ऑफिसमधील विरोधकांपासून आणि वैयक्तिक आयुष्यात अडथळे आणणाऱ्या लोकांपासून सावध रहा. आठवड्याचा पहिला भाग आरोग्य आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने फार अनुकूल नाही. लोकांशी बोलताना नम्रता ठेवा. आहार आणि दिनचर्या सांभाळली नाही तर शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवू शकतो.

2/7
मेष - नोकरीच्या शोधात असाल तर आठवड्याच्या उत्तरार्धात आशेचा किरण दिसेल. या काळात केलेले प्रयत्न यश देऊ शकतात, त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी ठेवा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यासाठीही हा काळ चांगला असेल.भाग्यवान रंग: लाल भाग्यवान क्रमांक: 8
मेष - नोकरीच्या शोधात असाल तर आठवड्याच्या उत्तरार्धात आशेचा किरण दिसेल. या काळात केलेले प्रयत्न यश देऊ शकतात, त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी ठेवा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक आयुष्यासाठीही हा काळ चांगला असेल.भाग्यवान रंग: लालभाग्यवान क्रमांक: 8
advertisement
3/7
वृषभ - या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांनी ऊर्जा, पैसा आणि वेळ योग्य पद्धतीने वापरला तर मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आठवड्याची सुरुवात काही मोठ्या खर्चाने होऊ शकते. वैयक्तिक अडचणी सोडवण्यात वेळ जाईल. आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात मुलांशी संबंधित किंवा घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावू शकते, पण या कठीण काळात आप्तस्वकीय साथ देतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि वैयक्तिक आयुष्यात मित्र-नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील. अडचणी असूनही आर्थिक प्रगती दिसेल.

4/7
वृषभ - आधी केलेल्या गुंतवणुकीतून आठवड्याच्या शेवटी चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मोठा व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसाय वाढेल. नातेसंबंधांच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे. कुटुंबात प्रेम आणि जिव्हाळा राहील. प्रेमसाथीदारासोबत चांगले क्षण घालवता येतील. वैवाहिक जीवन सुखकर राहील आणि जोडीदार अडचणींमध्ये मदत करेल.भाग्यवान रंग: निळा भाग्यवान क्रमांक: 9
वृषभ - आधी केलेल्या गुंतवणुकीतून आठवड्याच्या शेवटी चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित नफा मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मोठा व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसाय वाढेल. नातेसंबंधांच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे. कुटुंबात प्रेम आणि जिव्हाळा राहील. प्रेमसाथीदारासोबत चांगले क्षण घालवता येतील. वैवाहिक जीवन सुखकर राहील आणि जोडीदार अडचणींमध्ये मदत करेल.भाग्यवान रंग: निळाभाग्यवान क्रमांक: 9
advertisement
5/7
मिथुन साप्ताहिक राशीभविष्य - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच भाग्यशाली ठरेल. अनेक कामं अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला काम किंवा व्यवसायानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो, जो सुखद आणि फायद्याचा ठरेल. प्रवासात प्रभावी लोकांची भेट होईल. मर्यादित साधनांतूनही मोठं यश आणि नफा मिळवता येईल. व्यवसायात घेतलेले योग्य निर्णय सध्याच नाही तर भविष्यातही फायदा देतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना विशेष लाभ होईल.

6/7
मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो. कामं वेळेवर पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घ्याल. नातेसंबंध स्थिर राहतील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भावंडांशी प्रेम आणि सलोखा राहील. संवाद आणि तडजोडीमुळे वडिलोपार्जित संपत्तीचा प्रश्न सुटू शकतो. प्रेमसंबंध अनुकूल राहतील. अविवाहितांसाठी लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतात. घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे.भाग्यवान रंग: हिरवा भाग्यवान क्रमांक: 4
मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो. कामं वेळेवर पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घ्याल. नातेसंबंध स्थिर राहतील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भावंडांशी प्रेम आणि सलोखा राहील. संवाद आणि तडजोडीमुळे वडिलोपार्जित संपत्तीचा प्रश्न सुटू शकतो. प्रेमसंबंध अनुकूल राहतील. अविवाहितांसाठी लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतात. घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे.भाग्यवान रंग: हिरवाभाग्यवान क्रमांक: 4
advertisement
7/7
कर्क साप्ताहिक राशीभविष्य - कर्क राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला भाग मध्यम स्वरूपाचा असेल, तर उत्तरार्ध अधिक चांगला ठरेल. त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी ठेवा. सुरुवातीला घर, कुटुंब किंवा कामाशी संबंधित चिंता वाढू शकते. जमीन-जुमल्याच्या वादांसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना मेहनत जास्त घ्यावी लागेल. या काळात प्रेम आणि सहकार्याने कामं पूर्ण होतील, हट्ट केल्यास बिघाड होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित चिंता वाढू शकते. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस कमी होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी मोठ्या खर्चामुळे अध्यात्माकडे लक्ष कमी जाईल, पण कामातील सुधारणा सकारात्मक परिणाम देतील. नातेसंबंध टिकवण्यासाठी गैरसमज टाळा. प्रेमात सावधपणे वागा आणि एकमेकांच्या भावना समजून घ्या.भाग्यवान रंग: पिवळा भाग्यवान क्रमांक: 8
कर्क साप्ताहिक राशीभविष्य - कर्क राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला भाग मध्यम स्वरूपाचा असेल, तर उत्तरार्ध अधिक चांगला ठरेल. त्यामुळे महत्त्वाची कामं आठवड्याच्या शेवटी ठेवा. सुरुवातीला घर, कुटुंब किंवा कामाशी संबंधित चिंता वाढू शकते. जमीन-जुमल्याच्या वादांसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना मेहनत जास्त घ्यावी लागेल. या काळात प्रेम आणि सहकार्याने कामं पूर्ण होतील, हट्ट केल्यास बिघाड होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित चिंता वाढू शकते. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस कमी होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी मोठ्या खर्चामुळे अध्यात्माकडे लक्ष कमी जाईल, पण कामातील सुधारणा सकारात्मक परिणाम देतील. नातेसंबंध टिकवण्यासाठी गैरसमज टाळा. प्रेमात सावधपणे वागा आणि एकमेकांच्या भावना समजून घ्या.भाग्यवान रंग: पिवळाभाग्यवान क्रमांक: 8
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement