सिग्नलचं टेन्शन संपणार! पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट; कधी होणार खुला?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची मुख्य समस्या असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या कामानी आता वेग घेतला आहे. येत्या काही दिवसांत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची मुख्य समस्या असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल आणि माण-हिंजवडी मेट्रो (लाईन-३) प्रकल्पाच्या कामांनी आता वेग घेतला आहे. येत्या काही दिवसांत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असून, यामुळे पाषाण, बाणेर आणि हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महानगर आयुक्तांकडून कामाची पाहणी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकतीच या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी टाटा प्रोजेक्ट्स आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या बाणेर रॅम्पचे काम अतिरिक्त मनुष्यबळ लावून युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
advertisement
तांत्रिक अडचणींवर उपाययोजना: पाषाण बाजूकडील रॅम्पच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या गळतीची समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच, हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेताना शिवाजीनगर, मोदीबाग आणि विद्यापीठ चौक येथील पादचारी पुलांच्या (FOB) कामाची सद्यस्थिती तपासण्यात आली. मेट्रो स्थानकांशी संबंधित तांत्रिक अडचणींवर चर्चा करून प्रकल्पाचा दर्जा राखण्यावर भर देण्यात आला.
advertisement
हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे शहरातील विशेषतः पश्चिम भागातील वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होईल, असा विश्वास डॉ. म्हसे यांनी व्यक्त केला आहे. या पाहणीवेळी पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सिग्नलचं टेन्शन संपणार! पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाबाबत मोठी अपडेट; कधी होणार खुला?







