अरे बापरे बाप! देव किती परीक्षा घेणार? २०२९ पर्यंत या राशीच्या मागे असणार शनि साडेसाती, येणार संकटच संकटं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : शनीदेवांचे नाव जरी घेतले तरी अनेकांच्या मनात भीतीची भावना निर्माण होते. विशेषतः ‘साडेसाती’ हा शब्द ऐकला की चिंता, ताणतणाव आणि अनिश्चिततेची भावना अधिकच वाढते.
मुंबई : शनीदेवांचे नाव जरी घेतले तरी अनेकांच्या मनात भीतीची भावना निर्माण होते. विशेषतः ‘साडेसाती’ हा शब्द ऐकला की चिंता, ताणतणाव आणि अनिश्चिततेची भावना अधिकच वाढते. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा केवळ त्रास देणारा ग्रह नसून तो कर्माचा न्यायाधीश मानला जातो. व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार तो फळ देतो. शनी साधारण अडीच वर्षांनी एक राशी बदलतो आणि त्याच्या या संक्रमणामुळे साडेसाती व ढैय्या यांचा प्रभाव अनेकांच्या जीवनावर पडतो. सध्या काही राशींवर शनीची साडेसाती सुरू असून या काळात येणाऱ्या अडचणी कधी संपणार आणि सुखाचे दिवस कधी सुरू होणार, याविषयी जाणून घेणे अनेकांना महत्त्वाचे वाटते.
कोणत्या राशींवर साडेसातीचा प्रभाव?
ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती एकूण साडेसात वर्षांची असते आणि तिचे तीन टप्पे असतात. प्रत्येक टप्पा अडीच वर्षांचा असतो. पहिला टप्पा तुलनेने सौम्य, दुसरा टप्पा सर्वाधिक कठीण, तर तिसरा टप्पा हळूहळू दिलासा देणारा मानला जातो. सध्या मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. हा काळ मानसिक ताण, आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे आणि नातेसंबंधांतील तणाव वाढवणारा ठरू शकतो.
advertisement
मीन राशीला कधी मिळणार दिलासा?
ज्योतिषांच्या मते, 3 जून 2027 रोजी शनी मीन राशीमधून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा संपेल. दुसरा टप्पा सर्वात कठीण असल्याने या तारखेनंतर मीन राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळण्यास सुरुवात होईल. त्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू होईल, जो तुलनेने कमी त्रासदायक मानला जातो. अखेर 9 ऑगस्ट 2029 रोजी शनी वृषभ राशीत प्रवेश करेल आणि मीन राशीवरील साडेसाती पूर्णपणे समाप्त होईल.
advertisement
2027 की 2029 नेमकी सुटका कधी?
ज्योतिषशास्त्र सांगते की, जरी साडेसातीचा शेवट 2029 मध्ये होत असला तरी खरा दिलासा 2027 पासूनच मिळू लागतो. कारण तिसऱ्या टप्प्यात शनी व्यक्तीला शिकवलेल्या धड्यांचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात. जर कर्म चांगले असतील तर या काळात प्रगती, स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढताना दिसतो. याच काळात कुंभ राशीसाठी साडेसाती पूर्णपणे संपेल, तर मेष राशीसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल.
advertisement
साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय
शनीच्या कठीण काळात संयम, शिस्त आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरतो. ज्योतिषी काही साधे उपाय सुचवतात. भगवान शिवाची मनोभावे पूजा करणे, नियमित चांगली कर्मे करणे, गरजू आणि अपंग व्यक्तींना अन्नदान व मदत करणे यामुळे शनीचा कोप कमी होतो, असे मानले जाते. शनी हा कर्माचा ग्रह असल्याने सकारात्मक विचार आणि सत्कर्म केल्यास साडेसातीचा काळही जीवनाला योग्य दिशा देणारा ठरू शकतो.
advertisement
(सदर बातमी फक्त महितीकरीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 6:39 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
अरे बापरे बाप! देव किती परीक्षा घेणार? २०२९ पर्यंत या राशीच्या मागे असणार शनि साडेसाती, येणार संकटच संकटं







