ZP Election: कोकणात राणेंचा 'नवा पॅटर्न', महाविकास आघाडी भुईसपाट, विजयी उमेदवारांची यादी
- Published by:Sachin S
Last Updated:
भाजपचे मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. 4 जिल्हा परिषदेत कमळं उमललं आहे.
सिंधुदुर्ग : महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न राबवून विरोधकांना चांगलाच धक्का दिला. आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही भाजपने बिनविरोध निवडणुकीचा धमाका लावला आहे. कोकणामध्ये भाजपने विजयी सुरुवात केली आहे. भाजपचे मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. 4 जिल्हा परिषदेत कमळं उमललं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने राजकीय ताकद दाखवत मोठी मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना (शिंदे गट) महायुतीने बिनविरोध विजयांची मालिकाच रचली आहे.
जिल्ह्यात भाजपचे चार जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध, तर शिवसेना (शिंदे गट)चा एक जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आला आहे.
नितेश राणेंचा करिष्मा
या सोबतच पाच पंचायत समिती सदस्यही बिनविरोध निवडून आल्याने, महायुतीचे एकूण पाच जिल्हा परिषद सदस्य आणि पाच पंचायत समिती सदस्य बिनविरोध झाले आहेत. या राजकीय यशामागे भाजप नेते आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा प्रभाव आणि संघटनात्मक ताकद महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.
advertisement
दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी जिल्ह्यात पूर्णतः भुईसपाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या निकालानंतर माजी आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या पाच जागा बिनविरोध निवडून काढत विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. अजूनही बऱ्याच जागा 27 जानेवारीपर्यंत बिनविरोध होतील, असा दावा शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ केला आहे.
advertisement
बिनविरोध निवड झालेले उमेदवार
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
खारेपाटण जि. प.: प्राची इस्वलकर (भाजप)
जाणवली जि. प.: रूहिता राजेश तांबे (शिवसेना – शिंदे गट)
पडेल जि. प. (देवगड): सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
बापर्डे जि. प. (देवगड): अवनी अमोल तेली (भाजप)
बांदा जि. प.: प्रमोद कामत (भाजप)
कणकवली तालुका पंचायत समिती
बिडवाडी: संजना संतोष राणे (भाजप)
advertisement
वरवडे: सोनू सावंत (भाजप)
देवगड तालुका पंचायत समिती
पडेल: अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
नाडण: गणेश सदाशिव राणे (भाजप)
बापर्डे: संजना संजय लाड (भाजप)
वैभववाडी तालुका पंचायत समिती
कोकिसरे: साधना सुधीर नकाशे (भाजप)
Location :
Kankavli,Sindhudurg,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 11:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election: कोकणात राणेंचा 'नवा पॅटर्न', महाविकास आघाडी भुईसपाट, विजयी उमेदवारांची यादी










