TRENDING:

सोयाबीन दरात पुन्हा मोठी उलथापालथ! बाजारभावात तेजी येणार का? सध्याचे मार्केट काय?

Last Updated:

Soyabean Market Update : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर सध्या स्थिर ते मजबूत पातळीवर असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी अखेरीस आवक काही ठिकाणी वाढलेली असतानाही दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर सध्या स्थिर ते मजबूत पातळीवर असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी अखेरीस आवक काही ठिकाणी वाढलेली असतानाही दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बाजारांत दरांमध्ये काही प्रमाणात फरक असला तरी सरासरी दर 4,500 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत.
Soyabean Market Update
Soyabean Market Update
advertisement

विदर्भात तेजी

नागपूर बाजार समितीत 26 फेब्रुवारी रोजी लोकल सोयाबीनची 201 क्विंटल आवक झाली. येथे किमान 4,425 रुपये, कमाल 5,200 रुपये आणि सरासरी 5,006 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवण्यात आला. त्याच बाजारात दुसऱ्या दिवशीही व्यवहार सुरू राहिले असून दरात फारसा बदल जाणवलेला नाही. विदर्भातील अमरावती बाजारात 1,149 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,880 रुपये राहिला. कारंजा बाजारात 2,250 क्विंटल इतकी मोठी आवक असूनही सरासरी दर 5,050 रुपये मिळाल्याने बाजार मजबूत असल्याचे स्पष्ट होते.

advertisement

मराठवाड्यात काय भाव?

मराठवाड्यातील बाजारांमध्येही सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जालना येथे पिवळ्या सोयाबीनची 852 क्विंटल आवक झाली असून सरासरी दर थेट 5,350 रुपये नोंदवण्यात आला. तुळजापूर बाजारात 175 क्विंटल आवक असून येथे एकसारखा 5,151 रुपयांचा दर राहिला. औसा, आंबेजोबाई, मंगरुळपीर आणि नेर परसोपंत या बाजारांतही सरासरी दर 5,100 रुपयांच्या आसपास राहिले आहेत. काही ठिकाणी आवक कमी असल्याने दरात चढ-उतार दिसून आला आहे.

advertisement

उत्तर महाराष्ट्रात दर टिकून 

उत्तर महाराष्ट्रातील लासलगाव, विंचूर आणि निफाड परिसरातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर तुलनेने अधिक राहिले. लासलगाव बाजारात 299 क्विंटल आवक असून सरासरी दर 5,219 रुपये मिळाला, तर लासलगाव-विंचूर येथे 186 क्विंटल आवक असून सरासरी दर 5,200 रुपये नोंदवण्यात आला. लासलगाव-निफाड येथे पांढऱ्या सोयाबीनला कमाल 5,351 रुपये आणि सरासरी 5,300 रुपये असा चांगला भाव मिळाला. येवला बाजारात आवक अत्यल्प असली तरी सरासरी दर 5,071 रुपये राहिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट
सर्व पहा

काही बाजारांत मात्र कमी दर्जाच्या किंवा ओलसर मालामुळे दर घसरलेले दिसून आले. वरोरा-शेगाव, राहुरी आणि भिवापूर यांसारख्या ठिकाणी किमान दर 3,300 ते 3,750 रुपयांपर्यंत नोंदवले गेले. याउलट वाशीम बाजारात 1,800 क्विंटल इतकी मोठी आवक असूनही कमाल 6,500 रुपये आणि सरासरी 5,700 रुपये असा उच्चांकी दर मिळाल्याने लक्ष वेधले गेले. खामगाव बाजारातही 2,383 क्विंटल आवक असून सरासरी दर थेट 5,400 रुपये राहिला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन दरात पुन्हा मोठी उलथापालथ! बाजारभावात तेजी येणार का? सध्याचे मार्केट काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल