advertisement

Pune Shopping: फक्त 150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट, पाहा लोकेशन, Video

Last Updated:

Pune Shopping: या कुर्त्यांची किंमत केवळ 150 रुपयांपासून सुरू होत असल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

+
Pune

Pune Shopping: फक्त 150 रुपयांपासून ट्रेंडी कुर्ती, पिंपरी-चिंचवडला स्वस्तात शॉपिंग करायचीये, तर थेट इथं जायचं, Video

पुणे : पिंपरी-चिंचवड शहर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. औद्योगिक आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या या शहरात खरेदीसाठीही विविध पर्याय उपलब्ध आहेत. आकुर्डी परिसरातील चिखली रोडवरील न्यू फॅशन मार्केटमध्ये मुलींसाठी खास कुर्त्या होलसेल दरात उपलब्ध आहेत. याठिकाणी ट्रेंडी, आकर्षक आणि विविध डिझाइनमधील कुर्त्यांची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे या कुर्त्यांची किंमत केवळ 150 रुपयांपासून सुरू होत असल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कुर्त्यांची खरेदी करून तुम्ही तुमचा व्यवसाय देखील सुरू शकता.
पिंपरी-चिंचवड येथील पिंपरी मार्केटमधील न्यू फॅशन मार्केटमध्ये सध्या मुलींसाठी विविध डिझाइनच्या कुर्त्या होलसेल दरात उपलब्ध आहेत. येथील विक्रेते अरबाज शेख यांनी सांगितलं की, बाजारात 300 ते 400 रुपयांना विकल्या जाणाऱ्या कुर्त्या येथे अवघ्या 150 रुपयांमध्ये मिळत आहेत. तसेच लाँग कुर्ती देखील 150 ते 200 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे.
advertisement
कमी दरात आकर्षक आणि ट्रेंडी डिझाइन मिळत असल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, येथे खरेदी करून केवळ स्वतःसाठीच नव्हे तर छोटा व्यवसायही सुरू करता येऊ शकतो. अनेकजण येथे होलसेलमध्ये कुर्त्यांची खरेदी करून इतर ठिकाणी किरकोळ दरात विक्री करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आकुर्डीतील चिखली परिसरात न्यू फॅशन मार्केट याठिकाणी होलसेल भावात उपलब्ध आहेत.
advertisement
याशिवाय, होळीच्या पार्श्वभूमीवर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन आणि रंगीबेरंगी कपड्यांचा स्टॉक दाखल झाला आहे. सणासाठी खास पांढऱ्या, पेस्टल आणि ट्रेंडी डिझाइनच्या कुर्त्यांना विशेष मागणी असून ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. परवडणाऱ्या दरात आकर्षक कपडे उपलब्ध असल्यामुळे होळीच्या खरेदीसाठी हे मार्केट सध्या विशेष गजबजलेले पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pune Shopping: फक्त 150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट, पाहा लोकेशन, Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement