सेबीने बदले म्युच्युअल फंडचे नियम! पाहा याने गुंतवणूकदारांना कसा मिळेल फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडच्या स्किम्सविषयी तरतुदी कडक करण्यात आल्या आहेत. सेबीने म्हटले की, आता फंड मॅनेजर्स स्किम प्रकृतीच्या हिशोबाने त्याचं नाव ठेवतील आणि अनेक स्किम एकमेकांना ओव्हरलॅप करणार नाहीत. ही सख्ती म्युच्युअल फंड योजनांचे नाव आणि त्याच्या कॅटेगिरीचा भ्रम दूर करण्यासाठी लावण्यात आली आहे.
नवी दिल्ली : बाजार नियामक सेबीने गुरुवारी म्युच्युअल फंडसाठी कठोर नियम लागू केले होते. यामध्ये कॅटेगिरीच्या परिभाषा कठोर करण्यात आल्या आहेत आणि पोर्टफोलियो ओव्हरलॅपची मर्यादा ठरवण्यात आली आहे. जेणेकरुन स्किम्स तुमच्या नावानुसार गुंतवणूक करेल आणि डुप्लीकेशन रोखू शकेल.थीमॅटिक फंड्सला नियमांचे पालन करण्यासाठी 3 वर्षांचा नियम देण्यात आला आहे. तर इतर फंड्सला 6 महिन्याचा वेळ मिळेल.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या नवीन नियमांनुसार, म्युच्युअल फंड श्रेणींची संख्या 36 वरून 40 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये 13 इक्विटी, 17 कर्ज, 7 हायब्रिड, 2 "इंडेक्स फंड, ETF आणि फंड ऑफ फंड्स) आणि 1 लाइफ सायकल श्रेणी समाविष्ट आहे. SEBI ने पोर्टफोलिओ ओव्हरलॅपवर कठोर मर्यादा देखील लादल्या आहेत, विशेषतः सेक्टरल आणि थीमॅटिक फंडांसाठी, तसेच व्हॅल्यू आणि कॉन्ट्रा फंडसाठी कठोर नियम देखील लादले आहेत.
advertisement
एसेट मॅनेजर्ससाठी नवीन काय
एसेट मॅनेजर्स अजनही व्हॅल्यू आणि कॉन्ट्रा दोन्ही स्किम्स चालवू शकतात. मात्र दोन्ही पोर्टफोलिओमध्ये ओव्हलॅप 50% पेक्षा जास्त होऊ शकत नाही.थीमॅटिक इक्विटी स्कीमसाठी सेबीने म्हटले की, कोणत्याही स्किमचा पोर्टफोलियो 50% पेक्षा जास्त इतर थीमॅटिक स्किम्स किंवा इतर इक्विटी कॅटेगिरी (लार्ज-कॅप सोडून) ओव्हरलॅप होऊ नये.योजना त्यांच्या नावांनुसार गुंतवणूक करतात याची खात्री करण्यासाठी नियामक आता केवळ लेबल्सवरच नव्हे तर पोर्टफोलिओवर देखील लक्ष ठेवत आहे.
advertisement
स्कीम ओव्हरलॅप तिमाही मोजले जाईल
सेबीने ओव्हरलॅप मोजण्यासाठीची प्रोसेस देखील प्रमाणित केली आहे. आता ती तिमाही मोजली जाईल, त्या कालावधीतील दैनिक पोर्टफोलिओ ओव्हरलॅपची सरासरी घेतली जाईल. लेबलिंगपासून स्पष्ट सीमांकनाकडे हा एक मोठा बदल आहे आणि यामुळे एकाच एएमसीमध्ये डुप्लिकेट फंड कमी होतील. आता एकाच पोर्टफोलिओसह वेगवेगळ्या नावांनी अनेक योजना चालवणे कठीण होईल.
advertisement
विचार करुन ठेवावं लागेल स्किमचं नाव
नियामकांनी स्किमच्या नामकरणाचे नियमही कठोर केले आहेत. आता स्किमचं नाव त्याच्या कॅटेगिरीशी मिळत-जुळतं असावं. एसेट मॅनेजर्सला आपल्या वेबसाइटवर प्रत्येक महिन्याच्या कॅटेगिरीच्या हिशोबाने ओव्हरलॅपची माहिती द्यावी लागेल. इक्विटी विरुद्ध इक्विटी, डेट विरुद्ध डेट आणि हायब्रिड विरुद्ध हायब्रिड.
advertisement
SEBIने सोल्युशन-ओरिएंटेड योजना तात्काळ प्रभावाने बंद केल्या आहेत. सधाच्या स्किम्सला सबस्क्रिप्शन थांबवण्याचे आणि सेबीच्या मान्यतेने तत्सम योजनेत विलीन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन नियमांमध्ये लाभांश उत्पन्न, मूल्य आणि कॉन्ट्रा फंडांसाठी किमान 80% इक्विटी गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली आहे.. लाइफ सायकल फंड आणि सेक्टरल डेट फंड यासारख्या नवीन संरचना देखील सादर केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 3:01 PM IST









