advertisement

VIDEO : W,W,W...'बारामुल्ला एक्सप्रेस' सुस्साट, आकिबच्या बॉलिंगसमोर ट्रिपल सेंच्यूरी करणारा नायर, राहुल ठरले फेल

Last Updated:

आकिब नबीने यावेळी टीम इंडियाचा सिनिअर खेळाडू केएल राहुल आणि भारतासाठी ट्रिपल सेंच्यूरी करणाऱ्या खेळाडूला बाद केले आहे.त्याच्या या गोलंदाजीमुळे कर्नाटकचा निम्मा संघ माघारी परतला आहे.त्यामुळे आता कर्नाटकचा पहिला डाव ऑलआऊट होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Auqib Dar Wicket VIDEO
Auqib Dar Wicket VIDEO
Auqib Dar Wicket VIDEO : रणजीच्या ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्ये रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात बारामुल्ला एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकीब नबीने खतरनाक गोलंदाजी केली आहे. आकिब नबीने यावेळी टीम इंडियाचा सिनिअर खेळाडू केएल राहुल आणि भारतासाठी ट्रिपल सेंच्यूरी करणाऱ्या खेळाडूला बाद केले आहे.त्याच्या या गोलंदाजीमुळे कर्नाटकचा निम्मा संघ माघारी परतला आहे.त्यामुळे आता कर्नाटकचा पहिला डाव ऑलआऊट होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
खरं तर आज फायनलच्या तिसऱ्या दिवशी जम्मू काश्मीरचा पहिला डाव हा 584 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर कर्नाटक जम्मूला कडवी झूंज देईल असे वाटत होते. पण आकिब नबीच्या गोलंदाजीसमोर कर्नाटकने पहिल्या बॉलपासून गुडघे टेकल्याचे दिसले. कारण डावाच्या चौथ्या ओव्हरला कर्नाटकने 4 धावा काढल्या होत्या. त्यामुळे कर्नाटक दबावात खेळत होती, हे स्पष्ट झालं.
advertisement
advertisement
त्यानंतर आकिब नबीने केएल राहुलला खतरनाक बॉल टाकला, जो त्याला खेळताच आला नाही. आणि त्याच्या बॅटीला बॉल चाटून थेट विकेटकिपरच्या हातात बॉल गेला होता. त्यामळे टीम इंडियाचा केएल राहुल 13 धावांवर बाद झाला होता. राहुल बाद केल्यानंतर आकिब नबीने करुण नायरचा काटा काढला. राहुलप्रमाणेच आकिबने टाकलेला बॉलला करूण नायरला कळालाच नाही आणि त्याने ऑफस्टम्प उडवला.
advertisement
कर्नाटकचे दोन मोठे विकेट घेऊन आकिब शांत बसला नाही.त्याने करूण नायरनंतर मैदानात आलेल्या स्मरण रविचंद्रनला उलट्या पायाने माघारी धाडले होते.आकिबने टाकलेल्या बॉलवर खेळताना स्मरण वाधवानच्या हातात कॅच देऊन बसला होता.आकीबसोबत सुनील कुमारने कॅप्टन देवदत्त पड्डीकलची विकेट घेतली होती.
advertisement
सध्या मयंक अग्रवाल आणि श्रेयस गोपाल मैदानात असून त्यांनी कर्नाटकचा डाव सावरला आहे.त्यामुळे कर्नाटक किती धावांपर्यंत मजल मारते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : W,W,W...'बारामुल्ला एक्सप्रेस' सुस्साट, आकिबच्या बॉलिंगसमोर ट्रिपल सेंच्यूरी करणारा नायर, राहुल ठरले फेल
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement