सोलापूर - राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात सोलापूरचा विचार केला असता जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची लागवड झाली आहे. पुढील तीन दिवसांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसाच्या अंदाजामुळे पुन्हा आता शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन काढावे की नाही, याबाबत सोलापूर कृषी विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
advertisement
वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे (सोलापूर कृषी विभाग) यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी शेतीमधील सोयाबीन काढू नये. दोन-तीन दिवसानंतर उघडलेले वातावरण असेल तरच सोयाबीन काढावे आणि शेतामध्ये वाळविण्यासाठी मोकळीक जागामध्ये ठेवावे.
जर पावसाचा अंदाज आज किंवा उद्या असेल तर शेतकरी बांधवांनी सोयाबीन काढू नये. शेतकऱ्यांना वाटेल की सोयाबीन एक काडी दिसेल, शेंगा काळे पडलेले दिसतील, सोयाबीनचा खोड काळा पडलेला दिसेल. त्यामुळे सोयाबीनला काही नुकसान होणार नाही. पण जर तुम्ही सोयाबीन काढून ठेवला असेल आणि नंतर पाऊस आला तर त्यावेळी सोयाबीनचे जास्त नुकसान होईल, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी सोयाबीन जोपर्यंत वातावरण पूर्णपणे व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत सोयाबीन काढू नका, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला. शेतकऱ्यांना ते म्हणाले की, ज्यावेळी वातावरण उघडलेले दिसेल त्यावेळी सोयाबीन काढावा, जेणेकरून ते सोयाबीन वाळवता येईल. आता जरी सोयाबीन शेतकऱ्यांना काळा पडलेला दिसला असेल, शेंगा काळे पडलेले दिसले असेल, तरीसुद्धा त्यामधील दाणे हे काळे पडलेले नसतील, ते पांढरेच असतात. त्यामुळे सोयाबीनचा नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांनी जर सोयाबीन काढले आणि जर पाऊस आला तर मात्र सोयाबीनचे आतूनच नुकसान होईल, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे (सोलापूर कृषी विभाग) यांनी दिली.