TRENDING:

Soybean Price : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?

Last Updated:

कांदा, सोयाबीन, तूर आणि कापूस या प्रमुख पिकांची आवक आणि दर यासंबंधीची माहिती आपण मार्केट अपडेटमधून जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज हजारो क्विंटल शेतमालाची आवक होते. कांदा, सोयाबीन, तूर आणि कापूस या प्रमुख पिकांची आवक आणि दर यासंबंधीची माहिती आपण मार्केट अपडेटमधून जाणून घेऊया.
advertisement

कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दरावर दबाव कायम आहे. सोलापूरमध्ये सर्वात जास्त 44 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला कमीतकमी 100 तर सरासरी 900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर कमाल दर 2150 रुपये मिळाला.

APMC Market: आल्याचे दर वाढले, केळी आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा

advertisement

कापसाच्या दरात देखील मंदी असल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट इथे सर्वाधिक 9000 क्विंटल कापसाची आवक झाली. इथे कापसाला 7000 ते 8010 रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला.

अमरावती बाजार समितीत तुरीची सर्वाधिक 7152 क्विंटल आवक झाली. इथे तुरीला 8000 ते 8385 रुपये इतका दर मिळाला. तर हिंगणघाट बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 8640 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

लातूर बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक 9890 क्विंटल आवक झाली. 4861 ते 5281 इतका दर मिळाला. सोयाबीनच्या दरात मागील आठवड्यांच्या तुलनेत तब्बल 500 रुपये प्रति क्विंटलने घट झाली आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Soybean Price : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल