advertisement

APMC Market: आल्याचे दर वाढले, केळी आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा

Last Updated:

बुधवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
News18

News18

मुंबई: बुधवार, दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, केळी आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
आल्याच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2513 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 754 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 3530 ते 6030 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 25 क्विंटल आल्यास 5500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 358 क्विंटल केळीची आवक राहिली. यापैकी नाशिक बाजारात सर्वाधिक 230 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 900 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई बाजारात आवक झालेल्या 90 क्विंटल केळीस सर्वाधिक 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक कमी
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1923 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर बाजारात 718 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 14000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 19 क्विंटल डाळिंबास सर्वाधिक 13000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: आल्याचे दर वाढले, केळी आणि डाळिंबाची काय स्थिती? इथं चेक करा
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement