advertisement

Menopause : महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ, रजोनिवृत्तीचा मेंदूवरही होतो परिणाम, वाचा संशोधनातली महत्त्वाची माहिती

Last Updated:

नवीन संशोधनानुसार, रजोनिवृत्ती हा केवळ एक शारीरिक बदल नाही; तर यामुळे मेंदूतील grey matter ही कमी करू शकतो. या घटकाचा थेट परिणाम स्मरणशक्ती, झोप आणि मानसिक शांतीवर होतो. तुम्ही स्वत: किंवा घरातील कोणतीही महिला 45 ते 55 वयोगटातील असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

News18
News18
मुंबई : मासिक पाळीपासून रजोनिवृत्तीपर्यंतचा काळ म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातलं मोठं स्थित्यंतर. रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी बंद होणं हे आपण जाणून असतो पण या महत्त्वाच्या टप्प्याचा मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो असं केंब्रिज विद्यापीठाच्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.
नवीन संशोधनानुसार, रजोनिवृत्ती हा केवळ एक शारीरिक बदल नाही; तर यामुळे मेंदूतील grey matter ही कमी करू शकतो. या घटकाचा थेट परिणाम स्मरणशक्ती, झोप आणि मानसिक शांतीवर होतो. तुम्ही स्वत: किंवा घरातील कोणतीही महिला 45 ते 55 वयोगटातील असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
advertisement
सायकॉलॉजिकल मेडिसिनमधे प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी यूके बायोबँकमधील डेटाचा उपयोग केला. यामधे जवळजवळ 1,25,000 महिलांचा समावेश होता. यामधे ज्यांची मासिक पाळी सुरु आहे आणि ज्यांना रजोनिवृत्ती आलेली आहे अशा दोन्ही महिलांचा समावेश होता.
अभ्यासाचे मुख्य निष्कर्ष -
मेंदूच्या रचनेत बदल: रजोनिवृत्तीनंतर मेंदूच्या अनेक प्रमुख भागांमधे grey matter या घटकाचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून आलं.
advertisement
मानसिक आरोग्य: चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांमधे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळून आलं.
मानसिक आरोग्य आणि झोपेवर खोलवर परिणाम -
रजोनिवृत्तीपूर्व महिलांपेक्षा रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना मानसिक आरोग्याच्या समस्या जास्त असतात असं संशोधकांना आढळून आलं.
चिंता आणि नैराश्य: रजोनिवृत्तीनंतरच्या महिला चिंता किंवा नैराश्यासाठी डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याची शक्यता जास्त असते.
झोपेचा अभाव: रजोनिवृत्तीनंतर निद्रानाश आणि कमी झोप हे बदल जास्त जाणवले.
advertisement
थकवा: पुरेशी झोप घेतली तरीही सतत थकवा जाणवत असल्याचं महिलांनी सांगितलं.
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी : एचआरटी घेणाऱ्या महिलांमधे चिंता आणि नैराश्याचे प्रमाण जास्त होतं.
रजोनिवृत्ती सुरू होण्यापूर्वीच या समस्या होत्या असं बारकाईनं तपासणी केल्यावर दिसून आलं.
मेंदूची सुस्ती आणि अल्झायमरचा धोका - या अभ्यासात अंदाजे 11,000 महिलांचे एमआरआय स्कॅन होते.
advertisement
रजोनिवृत्तीनंतर, मेंदूच्या हिप्पोकॅम्पस अशा काही भागांमधे grey matter कमी झालं होतं. हा घटक, स्मृती  आणि शिक्षणासाठी अत्यावश्यक असतो.
विलंबित प्रतिक्रिया: डॉ. कॅथरीना झुहल्सडॉर्फ यांच्या मते, वयानुसार आपली प्रतिक्रिया देण्याची क्षमता नैसर्गिकरित्या कमी होते, पण रजोनिवृत्तीमुळे हे प्रमाण वाढतं.
अल्झायमर : मेंदूचे प्रभावित भाग अल्झायमर रोगाशी संबंधित भागांसारखेच आहेत. यामुळे कदाचित महिलांना पुरुषांपेक्षा डिमेंशिया होण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट असते.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, रजोनिवृत्ती ही आयुष्य बदलणारी घटना आहे. या टप्प्यातून जाणाऱ्या महिलांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स:
निरोगी जीवनशैली : व्यायाम करा, सक्रिय रहा आणि संतुलित आहार घ्या. यामुळे रजोनिवृत्तीचे परिणाम कमी करण्यास मदत होते.
लाजू नका: महिलांनी त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल बोलण्यास लाज वाटू नये. त्रास होत असेल तर इतरांना सांगा आणि मदत मागा.
advertisement
HRT चे परिणाम:  हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी मेंदूतील बदल पूर्णपणे थांबवत नसली तरी, ती घट होण्याचा दर कमी करते असं संशोधनात आढळून आलं आहे. रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आधार आणि संवेदनशीलतेची देखील आवश्यकता असते असं या अभ्यासातून स्पष्ट होतं.
ही माहिती केवळ महिलांसाठी नाही तर तिच्या प्रत्येक कुटुंबीयासाठी महत्त्वाची आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Menopause : महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ, रजोनिवृत्तीचा मेंदूवरही होतो परिणाम, वाचा संशोधनातली महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement