Heart Care : कोणतीही लक्षणं नसतानाही हृदयविकाराचा धोका असतो ? जाणून घेऊया कारणं, कोणते बदल करणं आहे आवश्यक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपण अनेकदा असं गृहीत धरतो की जे लोक तंदुरुस्त आहेत, नियमित व्यायाम करतात, योग्य आहार घेतात आणि ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर हृदयविकाराचा धोका असतो पण, या भ्रमात राहू नका. अगदी निरोगी दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
मुंबई : उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो. पण ज्यांना रक्तदाब, मधुमेह नाही त्यांनाही हा धोका असतो.
आपण अनेकदा असं गृहीत धरतो की जे लोक तंदुरुस्त आहेत, नियमित व्यायाम करतात, योग्य आहार घेतात आणि ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर हृदयविकाराचा धोका असतो पण, या भ्रमात राहू नका. अगदी निरोगी दिसणाऱ्यांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
निरोगी असूनही हृदयविकाराचा झटका का येतो ? - हृदयाचं आरोग्य केवळ जीवनशैलीवरचं अवलंबून असतं असं नाही. जोखमीचे ठरु शकतात असे अनेक घटक, आपल्या नजरेआड झालेले असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे अनुवंशशास्त्र, म्हणजेच कौटुंबिक इतिहास. पालकांना किंवा जवळच्या नातेवाईकांना लहान वयातच हृदयरोग झाला असेल, तर तंदुरुस्ती कितीही असो, हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
advertisement
वय - वयाच्या चाळिसाव्या वर्षानंतर हृदयविकाराचा धोका हळूहळू वाढतो. पुरुषांमधे हा धोका लवकर दिसून येतो, तर महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हा धोका वाढतो. सोरायसिस किंवा संधिवात यांसारखे काही दाहक रोग हृदयाच्या धमन्यांचं नुकसान करू शकतात, ज्यामुळे प्लेक जमा होण्याचा आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. एखादी व्यक्ती तंदुरुस्त असली तरीही हा धोका असतो.
advertisement
व्यायाम केला तरीही उच्च कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब असू शकतो. यातही लक्षणं दिसतीलच असं नाही. म्हणूनच वीस वर्षांच्या वयानंतर दर चार-सहा वर्षांनी कोलेस्ट्रॉल प्रोफाइल तपासणं महत्वाचं आहे.
ताण हा देखील एक प्रमुख पण अनेकदा दुर्लक्षित केलेला घटक आहे. बराच काळ असलेल्या ताणामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही वाढू शकतं, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. एखाद्या तंदुरुस्त किंवा तरुण व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा तो अचानक आला असं वाटतं पण बहुतेकदा त्याची लक्षणं आधीच दिसून येतात.
advertisement
छातीत दाब जाणवणं, घट्टपणा वाटणं किंवा सौम्य वेदना होणं
जबडा, मान, खांदे किंवा पाठीत वेदना होणं
अचानक श्वास घेण्यास त्रास होणं
व्यायामादरम्यान चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं
महिलांमधे तीव्र थकवा, छातीत सौम्य अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं जाणवतात.
advertisement
प्रतिबंधात्मक उपाय -
- रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉल यासारख्या नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
- कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल जाणून घेणं आणि त्यासंदर्भात डॉक्टरांशी मोकळेपणानं बोलणं आवश्यक आहे.
- योग, ध्यान करुन ताण व्यवस्थापन करण्याकडे लक्ष केंद्रित करा.
- धूम्रपान/वेपिंग सोडा आणि निरोगी आहार करण्यावर भर द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 6:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Care : कोणतीही लक्षणं नसतानाही हृदयविकाराचा धोका असतो ? जाणून घेऊया कारणं, कोणते बदल करणं आहे आवश्यक









