advertisement

Mumbai Water: मुंबईत 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार, गुरूवारी 'या' भागांत नसणार पाणी!

Last Updated:

मानखुर्द आणि चेंबूरमधील रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. एम पूर्व आणि एम पश्चिम भागामध्ये 30 तासांसाठी पूर्णत: पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

water supply will be cut off for 30 hours in many areas of m east and m west wards in mumbai from the late night of 12th february 2026
water supply will be cut off for 30 hours in many areas of m east and m west wards in mumbai from the late night of 12th february 2026
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मानखुर्द आणि चेंबूरमधील रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच गुरूवारी (12 फेब्रुवारी) एम पूर्व आणि एम पश्चिम भागामध्ये 30 तासांसाठी पूर्णत: पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. महानगर पालिकेकडून पाणीकपात केल्या जाणाऱ्या भागात पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. पाणी पुरवठा 12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 वाजल्यापासून 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळामध्ये अत्यावश्यक कामे पूर्ण केली जाणार आहेत.
पाणी पुरवठा का केला जाणार आहे?
मुंबई महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, 13 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पुढचे दोन ते तीन दिवस पाण्याचा वापर जपून करावा. एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी तुर्भे लो- लेव्हल जलाशयामध्ये 1200 मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवर 1200 मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसवले जाणार आहे. शिवाय, तुर्भे लो- लेव्हल जलाशयाला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या 1200 मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीचे टनेल शाफ्टला जोडणाऱ्या 1200 मिलिमीटर व्यासाच्या जलजोडणी केली जाणार आहे.
advertisement
यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात पाणी पुरवठा होणार नाही. ज्या विभागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही, त्या भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, पाण्याच्या पाईपलाईनचे काम केले जाणार असल्यामुळे नागरिकांनी पुढचे काही दिवस पाणी उकळून प्यावे, असे आवाहन सुद्धा महानगर पालिकेने केले आहे.
advertisement
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
1). एम पूर्व विभाग
  • एच. पी. सी. एल. रिफायनरी, एच. पी. सी. एल. वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बी. ए. आर. सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बी. पी. सी. एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ (नियमित पाणीपुरवठा 24 तास) (12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 ते 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
  • आर. सी. एफ. कॉलनी (नियमित पाणीपुरवठा 24 तास) (12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 ते 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
  • जुनी रिफायनरी क्षेत्र, भारत नगर, जे. प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एम. ए. सी. बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर. एन. ए. उद्यान, म्हाडा वसाहती, रॉकलाईन इमारती, विष्णू नगर, व्हिडिओकॉन इमारती, एस. जी. केमिकल इमारती, प्रयागनगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 6 ते दुपारी 2:30) (12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 ते 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
  • ओम-गणेश नगर, राहुल नगर, अशोक नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3) (12 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 ते 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
advertisement
2). एम पश्चिम विभाग
  • बीपीटी, टाटा, बी. पी. सी. एल., माहुल गाव, मरवली चर्च, माहुल एसआरए, फारुख गल्ली, खडी मशीन, आर. सी. मार्ग, सिंधी सोसायटी, एसआरए इमारती, वाशी नाका, अंबा पाडा, जिजामाता नगर, वित्तसंचयन, साईलीला रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर कॅम्प, गणेश नगर, अशोक नगर, कोकण नगर, वाशीगाव, म्हाडा इमारती, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, मितुल एन्कलेव, म्हैसूर कॉलनी, एम. एस. इमारती, विजय नगर, आर. सी. मार्ग (नियमित पाणीपुरवठा 24 तास) (12 फेब्रुवारी रोजी मध्यरा‍त्री 2 ते 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: मुंबईत 30 तास पाणीपुरवठा बंद राहणार, गुरूवारी 'या' भागांत नसणार पाणी!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement