advertisement

Eknath Khadse: एकनाथ खडसेंविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Last Updated:

एकनाथ खडसे यांच्याविरोधात सावदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिसांना अर्वाच्च शब्दात अरेरावी केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.
सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्य प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्च शब्दात अरेरावी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे या संदर्भात फोनवरून माहिती देताना एकनाथ खडसेंकडून त्यांच्याविरोधात तक्रारीत केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement

अर्वाच्च भाषेत अरेरावी केल्याचा आरोप

समोर आलेल्या माहितीनुसार, सावदा परिसरात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात सुरू असलेल्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी एकनाथ खडसे हे सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी संबंधित प्रकरणात कारवाई का करण्यात आली, याबाबत त्यांनी पोलिस निरीक्षकांकडे विचारणा केली. मात्र याच दरम्यान खडसे यांनी अर्वाच्च भाषेत अरेरावी केल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.
advertisement

नेमकं काय घडलं? 

या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत खडसे यांच्याविरोधात कलम २९६ नुसार गुन्हा नोंदवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन व शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

एकनाथ खडसेंनी आरोप फेटाळले

advertisement
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “गौण खनिज प्रकरणात चौकशीसाठी मी सावदा पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यावेळी संवादादरम्यान माझ्याकडून एक चुकीचा शब्द निघाला. त्याबद्दल मी तत्काळ पोलीस निरीक्षकांची माफी मागितली आहे. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून अरेरावी केल्याचा आरोप करण्यात येत आहे,”असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Khadse: एकनाथ खडसेंविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement