advertisement

Agriculture News : 'मुन्नी'ने दिला दगा, 5 लाखांचं झालं नुकसान, शेतकऱ्याची थेट कृषी विभागाकडे तक्रार, Video

Last Updated:

जालन्यात मात्र तुरीच्या मुन्नी नावाच्या वाणाने शेतकऱ्यांसोबत दगाफटका केलाय. याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

+
डोंगरे

डोंगरे

जालना : मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिए असा फिल्मी डायलॉग तुम्ही देखील ऐकला असेल. जालन्यात मात्र तुरीच्या मुन्नी नावाच्या वाणाने शेतकऱ्यांसोबत दगाफटका केलाय. याचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. जालन्यात मुन्नी नावाचे तुरीचे वाण बदनाम झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या या वाणाच्या तुरीला शेंगाच लगडल्या नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यातील कर्जतचे शेतकरी राधाकिसन डोंगरे यांनी आपल्या सहा एकर शेतात तुरीच्या मुन्नी या वाणाची लागवड केली होती. परंतु, फेब्रुवारी महिना उजाडला तरीदेखील या वाणाच्या तुरीला शेंगा लगडल्या नाहीत. गट क्रमांक २२३ मध्ये तब्बल ७ एकर शेतात त्यांनी या वाणाची लागवड केली आहे. याच शेतात लावलेल्या गोदावरी वाणाला चांगल्या शेंगा लगडल्या आहेत. त्यामुळे बियाणे कंपनीने बोगस बियाणे दिल्यानेच माझे 4 ते 5 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीने त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी राधाकिसन डोंगरे यांनी केली आहे.
advertisement
18 जून रोजी सहा फुटाच्या अंतरावर या वाणाची लागवड केली होती. या पिकाला दोन वेळा फवारणी तर तीन वेळा रासायनिक खत दिले तरी देखील पिकाला शेंगा लागत नव्हत्या. तेव्हा या वाणातच समस्या असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही याची कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी विभागाने पंचनामे केला असून लवकरच भरपाई मिळेल असे सांगितले. परंतु, माझे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण नुकसानभरपाई मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी डोंगरे यांनी केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : 'मुन्नी'ने दिला दगा, 5 लाखांचं झालं नुकसान, शेतकऱ्याची थेट कृषी विभागाकडे तक्रार, Video
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement