Agriculture News : शेतकऱ्यांनो, साखर कारखान्यांतील वजनकाट्यांबाबत शंका? अशी करा वेळीच तक्रार, Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
साखर कारखान्यांमध्ये वापरात असणाऱ्या सर्व वजन काट्यांची पडताळणी आणि मुद्रांकन वैध मापनशास्त्र विभागामार्फत करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : सन 2025-26 चा साखर गाळप हंगाम सध्या सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांमध्ये वापरात असणाऱ्या सर्व वजन काट्यांची पडताळणी आणि मुद्रांकन वैध मापनशास्त्र विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर वाहन काट्यांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांमार्फत नियमित तपासण्या सुरू आहेत, असे छत्रपती संभाजीनगर सहनियंत्रक वैधमापन विभागाने सांगितले आहे.
शेतकऱ्यांना जर उसाच्या वजनाबाबत कोणतीही शंका किंवा तक्रार असल्यास त्यांनी आपल्या वाहनाचे वजन साखर कारखान्याबाहेरील अधिकृत वजन काट्यावर करून घ्यावे आणि वजनाबाबतची रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेरील वजन काट्यावरील वजन आणि साखर कारखाना परिसरातील वाहन काट्यावरील वजनामध्ये तफावत आढळून आल्यास संबंधितांनी तात्काळ वैध मापनशास्त्र कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी. शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील वैध मापनशास्त्र कार्यालयांशी संपर्क साधावा.
advertisement
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या क्रमांकावर करता येणार तक्रार
सहनियंत्रक वैध मापनशास्त्र सु.ह. चाटे, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर दूरध्वनी क्रमांक 0240 2952656, भ्रमणध्वनी क्रमांक 9420699011.
उपनियंत्रक वैध मापनशास्त्र शि.ये. मुंढे छत्रपती संभाजीनगर दूरध्वनी क्रमांक 0240-2483818, भ्रमणध्वनी क्रमांक 8208861270.
advertisement
उपनियंत्रक वैध मापनशास्त्र बीड
जिल्हा गं.मा. कांबळे दूरध्वनी क्रमांक 02442 222417, भ्रमणध्वनी क्रमांक - 9067146884.
उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र र.धो. दराडे (अति कार्यभार) जालना जिल्हा दूरध्वनी क्रमांक 02482 220743, भ्रमणध्वनी क्रमांक 9421439999, उपनियंत्रक वैधमापनशास्त्र गं.मा. कांबळे (अति कार्यभार) दूरध्वनी क्रमांक - 02452 221258, भ्रमणध्वनी क्रमांक 9067146884.
उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र नांदेड, लातूर व धाराशिव आ.आ.कुलकर्णी (अति. कार्यभार) दूरध्वनी क्रमांक 02462-233881, भ्रमणध्वनी क्रमांक 9325702569.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 3:03 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : शेतकऱ्यांनो, साखर कारखान्यांतील वजनकाट्यांबाबत शंका? अशी करा वेळीच तक्रार, Video








