सोलापूर - बुद्धी, चिकाटी, नवीन प्रयोग करण्याची क्षमता आणि कल्पकतेच्या ताकदीवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील तरुण शेतकरी अविनाश गायकवाड यांनी 30 गुंठ्यात देशी जव्हार या टोमॅटोची लागवड केली. टोमॅटो लागवडीला 30 गुंठ्यात 60 हजार रुपये इतका खर्च आला आहे. तर त्याला पहिल्याच तोड्यात टोमॅटो विक्रीतून 1 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
अविनाश गायकवाड यांनी 30 गुंठ्यात टोमॅटोची लागवड केली आहे. बाजारपेठेनुसार लागवडीचे नियोजन, सुधारित तंत्राने लागवड, एकात्मिक पीक व्यवस्थापन करुन टोमॅटोचे किफायतशीर उत्पन्न मिळाले आहे. टाकळी सिकंदर गावातील शेतकरी अविनाश गायकवाड यांचे शिक्षण ग्रॅज्युएशन झाले आहे.
अविनाश आधी 30 गुंठ्यात डाळिंबाची शेती करत होते. डाळिंबावर तेल्या रोग, मर रोग आदी रोगामुळे डाळिंबाची शेती परवडत नसल्याने तरुण शेतकरी अविनाश गायकवाड यांनी 30 गुंठ्यात टोमॅटोची शेती करायचा निर्णय घेतला. 30 गुंठ्यात 4 हजार टोमॅटोच्या रोपाची लागवड केली आहे. टोमॅटो लागवडी फाउंडेशन बियाणे खत याचा सर्व मिळून 60 हजार रुपये इतका खर्च टोमॅटो लागवडीला आला आहे. सध्या टोमॅटोला 12 ते 15 रुपये दर बाजारात मिळत आहे. टोमॅटोची तोड चालू होऊन दोन महिने झाले असून या तोड्यात शेतकरी अविनाश गायकवाड यांना 1 लाख रुपये मिळाले आहे.
येत्या दीड महिन्यात अजून एक तोडा टमाट्याचा होणार असून त्यातून सुद्धा 1 लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न शेतकरी अविनाश गायकवाड यांना मिळणार आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे आवाहन युवा शेतकरी अविनाश गायकवाड यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना केले आहे.