खर्च एका एकरात फक्त 6 हजार रुपये, शेतकरी करतोय 10 वर्षांपासून लाखोंचं उत्पन्न मिळवून देणारी ही शेती PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
पंढरपूर तालुक्यातील एक शेतकरी गेल्या 10 वर्षांपासून रताळ्याची शेती करतोय. विशेष म्हणजे या रताळ्यांच्या शेतीतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रताळे लागवडीला एका एकरात फक्त 5 ते 6 हजार रुपये इतका खर्च येतो. या पिकाला कोणताही रोग लागत नसल्यामुळे फवारणीची गरज पडत नाही, असं शेतकरी सुधीर चव्हाण सांगतात. मागील वर्षी चव्हाण यांना सव्वा एकरात 600 पिशवी रताळे निघाले होते. त्यातुन 3 लाख रुपयांचे उत्पन्न हातात आले. तर यंदा देखील सव्वा एकरात रताळ्याची लागवड केली असून 300 ते 400 पिशवी माल निघण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच यंदा रताळ्याला 20 रुपये दराने जरी भाव मिळाला, तरी 4 ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे चव्हाण सांगतात.
advertisement
advertisement