अॅग्रिस्टॅक योजनेचा उद्देश हा सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे असा आहे. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या योजेतंर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी कळण्यास मदत होणार आहे. या योजनेला येत्या सोमवारपासून सुरवात केली जाणार असून प्रत्येक गावामध्ये या संबंधी शिबीर राबवले जाणार आहे.
advertisement
पुन्हा केवायसी करण्याची गरज नाही
अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विम्यासह सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल. यासाठी देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे. या कार्यक्रमात खसरा, खतौनी या शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्या आधारशी जोडल्या जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल कारण त्यांना सरकारी योजनांसाठी पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज भासणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांना हे काम 31 डिसेंबर 2024 पूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही विभागाच्या https://upfr.agristack.gov.in या वेब पोर्टलवर जाऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या नोंदणी शिबिरात किंवा ग्राम पंचायतमध्ये भेट देऊनही नोंदणी करू शकता.
