वडाळा गावातील शेतकरी अमोल भोसले यांनी मागील वर्षी त्याला सौर ऊर्जा अंतर्गत शेतामध्ये सौर पंप लावलेला आहे. सहा एकर जमिनीसाठी त्यांना 7.50 एचपीचा सौर ऊर्जा शेतामध्ये बसवण्यात आला आहे. शेती करत असताना अमोल यांना लाईट नसल्याने शेतीमध्ये पाणी देण्यासाठी अडचणी येत होत्या. तसेच रात्रीच्या वेळेस देखील शेतामध्ये येऊन पाणी देण्यास येत नव्हते.
advertisement
सहा एकर क्षेत्रामध्ये सौर पंप लावण्यासाठी अमोल यांना 45 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. तर सौर ऊर्जा लावत असताना दहा टक्के रक्कम फक्त भरलेली आहे. तर उर्वरित रक्कम शासनाने अनुदान दिलेले आहे. तर सौर ऊर्जा बसवल्यापासून वीज बिल शून्य झाले आहे. आपल्याला मिळेल त्या वेळेत सकाळी शेतात येऊन पिकांना पाणी देण्याचं काम अमोल भोसले करत आहेत.
सौर ऊर्जा बसवण्यापासून शेती करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. साडेसात एचपीची मोटर एकदा चालू केल्यावर चार एकर पर्यंत पाणी शेतामध्ये दिले जाते. शासनाने सुरू केलेली ही योजना फायदेशीर असून जास्तीत जास्त याच लाभ घ्यावा,असे आवाहन शेतकरी अमोल भोसले यांनी केले आहे.