Maharashra Politics : 'जाहीरात कशी, देवाभाऊसारखी...', फडणवीसांसमोर दादांचा टोला, मंत्रिमंडळ बैठकीत एकच हशा पिकला! Inside Story
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Maharastra Cabinate meeting Inside Story : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सध्या चर्चेत असलेल्या 'देवाभाऊ'च्या जाहिरातीचे पडसाद उमटल्याचं पहायला मिळालं. कॅबिनेट बैठकीत देखील याच मुद्द्यावरून हशा पिकला.
Maharastra Cabinate Meeting : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटल्याचं पहायला मिळालं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मराठा समाजात खालावल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर सर्वत्र देवाभाऊ नावाच्या जाहिराती दिसून आल्या होत्या. त्यावरून देखील अनेक पडसाद राज्याच्या राजकारणात पहायला मिळाले होते. अशातच आता मंत्रिमंडळ बैठकीत देखील देवाभाऊ जाहिरातीचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी अजित पवारांनी असा काही टोला लगावला की, देवेंद्र फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले.
जाहिरात कशी हवी तर ती देवाभाऊसारखी...
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कामाचं कौतूक केलं अन् चांगल्या धोरणाची प्रसिद्धी देखील चांगली करा, असं सांगितलं. त्यावेळी अजित पवार फडणवीसांवर घसरले. जाहिरात कशी हवी तर ती देवाभाऊसारखी... असं अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी फडणवीसांच्या चेहऱ्यावर देखील हसू फुललं. कुणी काहीही म्हणो पण जाहिरात अशीच व्हायला हवी, असं सांगत फडणवीसांनी विषयावर पडदा टाकला.
advertisement
मुंबई मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्राची राजधानी
दरम्यान, बैठकीत मुंबईला मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकताना उद्योग विभागाने तयार केलेल्या ऑनमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उद्योग विभागाकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या धोरणाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यातील कल्पना आणि तरतुदी आणि योजनांचे मंत्रिमंडळानं तोंडभरून कौतुक केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashra Politics : 'जाहीरात कशी, देवाभाऊसारखी...', फडणवीसांसमोर दादांचा टोला, मंत्रिमंडळ बैठकीत एकच हशा पिकला! Inside Story