Friday Release : आपला सिद्धूचा 'आतमी बातमी फुटली' ते खिलाडीचा 'JOLLY LLB 3', शुक्रवारी रिलीज होतायत 'हे' चित्रपट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Friday Theatre Release : 19 सप्टेंबर 2025 म्हणजे येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर हिंदी-मराठी अनेक दमदार चित्रपट रिलीज होत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित 'अजेय:द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' हा चित्रपट याच शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात योगी आदित्यनाथ यांचा संन्यासी होण्यापासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात अनंत जोशी यांनी योगींची भूमिका साकारली आहे.
advertisement
advertisement
अनुराग कश्यप यांच्या चित्रपटांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यांचा हा नवीन चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या ठाकरे, मोनिका पवार आणि जीशान आयूब यांचा समावेश आहे. चित्रपटात दोन जुळ्या भावांची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपटही 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
जंगल, संघर्ष आणि नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी सांगणार 'अरण्य' हा चित्रपट आहे. अमोल दिगांबर दिग्दर्शित अरण्य हा चित्रपट गडचिरोलीच्या खऱ्या जंगलात प्रत्यक्ष चित्रित करण्यात आला आहे.या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 19 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.