Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मेगाब्लॉक, वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?वाचा
Last Updated:
Mumbai Pune Expressway MegaBlock : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मेगाब्लॉक लागू केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांची माहिती एकदा पाहा.
मुंबई : मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज 16 सप्टेंबर 2025 रोजी मेगाब्लॉक लागू केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महामार्गावर देखभालीसाठी विशेष काम करणार आहे.
कधी राहणार बंद?
दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली जाणार आहे. कोन ब्रिजजवळील 9.600 ते 9.700 किलोमीटरच्या विभागात 22 KV भातन अजिवली वाहिनीचे काम होणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पर्यायी मार्गाचा करा वापर
प्रवासांमध्ये गैरसोय होऊ नये आणि महामार्गावरील कोंडी टाळता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी पर्यायी मार्गांचा तपशील जाहीर केला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना कळंबोली सर्कल, जेएनपीटी रोड डी पॉइंट आणि पळस्पे मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, शेंडूग एक्झिट (8.200 किमी) येथून देखील महामार्ग क्र. 48 वरून प्रवास सुरू केला जाऊ शकतो.
advertisement
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खोपोली एक्झिट मार्ग आणि खालापुर टोल नाका एक्झिट मार्गाने पाली ब्रीज वापरून वाहने महामार्गावर येऊ शकतात. या पर्यायी मार्गांचा वापर करून वाहन चालक खालापुर टोल नाका आणि मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करू शकतात. MSEDCL चे काम पूर्ण होईपर्यंत ही वाहतूक अधिसूचना लागू राहणार आहे. काम संपल्यानंतर, दुपारी 3 नंतर वाहतूक पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालकांनी दिली आहे.
advertisement
यासोबतच, महाराष्ट्रात आजपासून ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरच्या प्रवासासाठी भाडे ठरवले गेले असून प्रवाशांना या नव्या सुविधेमुळे शहरातील प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होईल. या सेवेमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल तसेच पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होईल.
याच दिवशी आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या हडपसर ते दिवेघाट विभागात रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंगचे कामही होणार आहे. यामुळे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे नागरिकांचा प्रवास सुरक्षित राहील आणि महामार्गावरील काम सुरळीत पार पडेल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मेगाब्लॉक, वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?वाचा