IND vs PAK : टीम इंडियावर लागणार दंड? हँडशेक न केल्याने रेफरी अ‍ॅक्शन घेणार? काय सांगतो ICC चा नियम?

Last Updated:

India vs Pakistan ICC Handshake Rule : सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी अखेरपर्यंत टिकून सामना खिशात घातला. त्यानंतर दोघांना एकमेकांना हँडशेक केलं अन् थेट ड्रेसिंग रुमची वाट धडली. सूर्यकुमार गनिमी काव्याचा वापर केला.

India vs Pakistan ICC Handshake Rule
India vs Pakistan ICC Handshake Rule
India vs Pakistan Match : आशिया चषक 2025 स्पर्धेच्या (Asia Cup 2025) साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) सात विकेट्सनी धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 128 धावांचं सोपं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान 16 व्या ओव्हरमध्ये पार केलं आणि पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. मात्र, मॅच संपल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानला जागा देखील दाखवली. टीम इंडियाने हँडशेक करणं टाळलं अन् पाकिस्तानला धडा शिकवला.

सूर्यकुमारने गनिमी काव्याचा वापर केला अन...

सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी अखेरपर्यंत टिकून सामना खिशात घातला. त्यानंतर दोघांना एकमेकांना हँडशेक केलं अन् थेट ड्रेसिंग रुमची वाट धडली. सूर्यकुमार गनिमी काव्याचा वापर केला अन् पाकिस्तानला धडा शिकवला. टीम इंडियाने हँडशेक केलं नाही. टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले अन् दरवाजा लावून घेतला. तर दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू टाटकळत उभे राहिले होते. मात्र, हँडशेक न केल्याने टीम इंडियावर दंड ठोठावला जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. या संदर्भात काही आयसीसीचा नियम आहे का? जाणून घ्या.
advertisement

आयसीसीचा काही नियम आहे का?

आयसीसीच्या कोणत्याही क्रिकेट नियम पुस्तकात असं कुठंही लिहिलेलं नाही की सामन्यानंतर हस्तांदोलन करणं अनिवार्य आहे. हस्तांदोलन हा नियम नाही पण तो क्रिकेटच्या भावनेचा एक भाग मानला जातो. यामुळेच दोन्ही संघांचे खेळाडू जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर एकमेकांना भेटतात. खेळाडूंमधील रोष दूर होतो पण हँडशेक करणं हा नियम नाही. हँडशेक हा नियम नसल्याने टीम इंडियाला दंड ठोठावला जाणार नाही.
advertisement

भारतीयांच्या भावनेचा आदर

दरम्यान, बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. या भारतीयांच्या भावनेचा आदर टीम इंडियाच्या खेळाडूंनी ठेवला. दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दणदणीत विजय साजरा केला. तसेच विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियावर लागणार दंड? हँडशेक न केल्याने रेफरी अ‍ॅक्शन घेणार? काय सांगतो ICC चा नियम?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement