IND vs PAK : टीम इंडियाला पाकिस्तानचं टेन्शनच नाही, पण 'हा' खेळाडू सूर्यालाही देणार त्रास, 3 दिवसापूर्वीच घेतलीये हॅटट्रीक!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचमध्ये पाकिस्तानी स्पिनर मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) हा टीम इंडियासाठी मोठा धोका ठरू शकतो.
IND vs PAK, Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच टीम इंडिया पाकिस्तानवर भारी पडेल, यात शंका नाही. परंतू पाकिस्तानला एक प्लेयर टीम इंडियाला त्रासदायक ठरू शकतो. हाच तोच प्लेयर ज्याने नुकतीच हॅटट्रीक घेतली होती.
ऐतिहासिक हॅटट्रिक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचमध्ये पाकिस्तानी स्पिनर मोहम्मद नवाज हा टीम इंडियासाठी मोठा धोका ठरू शकतो. नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याने ऐतिहासिक हॅटट्रिक घेतली, ज्यामुळे पाकिस्तानने ही मालिका जिंकली.
नवाजचा प्रभावी स्पेल
पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करताना 141 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानची टीम केवळ 66 धावांवर ऑल आऊट झाली. यात नवाजने 5 विकेट्स घेऊन अफगाणिस्तानची बॅटिंग लाईन-अप उध्वस्त केली. विशेष म्हणजे, त्याने आपल्या स्पेलमध्ये सलग तीन बॉलवर विकेट्स घेऊन टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये हॅटट्रिक घेणारा तो तिसरा पाकिस्तानी बॉल ठरला.
advertisement
स्पिनर्ससाठी अनुकूल पिच
युएईमधील पिच स्पिनर्ससाठी अनुकूल आहेत, त्यामुळे नवाजसारखा स्पिनर भारतीय बॅट्समनसाठी अडचणी निर्माण करू शकतो. त्याच्या या जबरदस्त फॉर्ममुळे टीम इंडियाच्या बॅट्समनना त्याच्याविरुद्ध सावध राहावे लागेल. मोहम्मद नवाजने अष्टपैलू कामगिरी करत बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये कमाल केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला एक मजबूत आधार मिळाला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची उत्सुकता
advertisement
एशिया कपमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज मॅच होणार आहे. या मॅचमध्ये मोहम्मद नवाजचा फॉर्म आणि त्याची बॉलिंग टीम इंडियासाठी किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियाला पाकिस्तानचं टेन्शनच नाही, पण 'हा' खेळाडू सूर्यालाही देणार त्रास, 3 दिवसापूर्वीच घेतलीये हॅटट्रीक!