Weather Alert: वारे वाहणार, विजा कडाडणार, मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. आज 5 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यता आला आहे.
advertisement
मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजी नगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार असून सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होईल.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी साधारणपणे 15 ते 35 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये 10 ते 30 मिमी पावसाची शक्यता असून परभणी व धाराशिव मध्येही याच प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे हवामानात काही प्रमाणात गारवा जाणवेल.
advertisement
advertisement