Kolhapur Dasara: कोल्हापूरचा दसरा आणखी रॉयल होणार! राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने केली मोठी घोषणा

Last Updated:

Kolhapur Dussehra: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरात शाही दसरा महोत्सव साजरा केला जातो.

Kolhapur Dasara: कोल्हापूरचा दसरा आणखी रॉयल होणार! राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने केली मोठी घोषणा
Kolhapur Dasara: कोल्हापूरचा दसरा आणखी रॉयल होणार! राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने केली मोठी घोषणा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. हे ठिकाण राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, करवीरनिवासीनी अंबाबाईचं निवासस्थान देखील आहे. या ठिकाणचा दसरा सोहळा प्रसिद्ध आहे. धर्म आणि राजसत्तेचा मिलाफ असलेल्या कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा समावेश आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत झाला आहे. गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अध्यादेशाद्वारे याची घोषणा केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान कोल्हापुरात शाही दसरा महोत्सव होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून हा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवांतर्गत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन युद्धकलांचं सादरीकरण केलं जातं. शाही दसऱ्याचा राज्य महोत्सवांच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाला प्रस्ताव सादर करून मंत्रालयीन स्तरावर विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
advertisement
शाही दसरा महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत सन 2025-26 या वर्षात आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेच्या 'प्रमुख पर्यटन महोत्सव यादी'त समावेश झाला आहे. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे, अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
advertisement
कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचं मंदिर आहे. शारदीय नवरात्रौत्सवामध्ये याठिकाणी देशातील विविध भागांतून किमान 30-40 लाख भाविक येतात. यावर्षी दसरा सण 2 ऑक्टोबर रोजी आला आहे. 191 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबरला आलेल्या दसरा सणादिवशीच भवानी मंडप कमानीचं उद्घाटन करण्यात आलं होतं.
जिल्ह्यातील पन्हाळगडाचा जागतिक वारसास्थळात समावेश झालेला आहे. श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरी मठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं कोल्हापूरमध्ये आहेत. त्यातच आता दसरा महोत्सवाला राज्याच्या मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Dasara: कोल्हापूरचा दसरा आणखी रॉयल होणार! राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने केली मोठी घोषणा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement