advertisement

Divya Shinde: 'एरव्ही संविधानाच्या गोष्टी करता...', BBM6 मध्ये पहिल्यांदाच दिसला बिग बॉसचा रुद्रावतार! दिव्याला झाप-झाप झापलं

Last Updated:

Vidya Shinde Eliminated: ना कोणती हाणामारी झाली, ना कोणता मोठा राडा; फक्त एका तलवारीच्या धमकीने दिव्याचं बिग बॉसच्या घरातील स्वप्न चौथ्या आठवड्यातच धुळीला मिळवलं आहे.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात दररोज राडे, ओरडाओरडा आणि टास्कमधील चढाओढ आपण पाहतोच आहोत. पण शुक्रवारी प्रेक्षकांना एक असा धक्का बसला, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सहसा स्पर्धक मतदानाने किंवा कमी मतांमुळे घराबाहेर पडतात, पण दिव्या शिंदे हिला मात्र चक्क तिच्या एका खळबळजनक विधानामुळे बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. ना कोणती हाणामारी झाली, ना कोणता मोठा राडा; फक्त एका तलवारीच्या धमकीने दिव्याचं बिग बॉसच्या घरातील स्वप्न चौथ्या आठवड्यातच धुळीला मिळवलं आहे.

"बाहेर मी सरकार म्हणून वावरते!"

घरामध्ये एक टास्क सुरू होता, जिथे स्पर्धकांना एकमेकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाने फुली मारून त्यांना घरासाठी अपात्र ठरवायचं होतं. तन्वी कोल्तेने जेव्हा दिव्याचं नाव घेतलं, तेव्हा दिव्याचा संयम सुटला. रागाच्या भरात ती जे बोलली, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
advertisement
दिव्या म्हणाली, "मी या घराबाहेर 'सरकार' म्हणून वावरते आणि माझ्या हातात कायम एक तलवार असते. आता ती तलवार घरी आहे, याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेन. बाहेर गेल्यावर मी ती तलवार चालवेन. ती कोणावर चालेल, हे तुम्ही माझ्याबद्दल काय बोलता यावर ठरेल." एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणं हे बिग बॉसच्या नियमावलीच्या पूर्णपणे विरोधात होतं.
advertisement

घरात गदारोळ अन् बिग बॉसचा रुद्रावतार

दिव्याच्या या विधानानंतर तन्वी, अनुश्री आणि रुचिता यांनी तिला धारेवर धरलं. "ही उघड धमकी आहे," असा आरोप त्यांनी केला. जेव्हा बिग बॉसने मध्यस्थी केली, तेव्हा दिव्याने आपली चूक मान्य करण्याऐवजी ही धमकीच असल्याचं ठामपणे सांगितलं. यावर बिग बॉसने अत्यंत कडक शब्दांत दिव्याला सुनावलं. बिग बॉस म्हणाले, "अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. एरव्ही संविधानाच्या, मानवी हक्कांच्या गोष्टी करता, महापुरुषांचे विचार मांडता आणि इथे येऊन धमकी देता. मी तुम्हाला बोलायची संधी देणार नाही."
advertisement

माफीला नकार अन् एक्झिट

प्रकरण वाढल्यावर बिग बॉसने दिव्या आणि राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. तिथे तिला आपली चूक सुधरवण्याची आणि घरातील सदस्यांची माफी मागण्याची संधी देण्यात आली. मात्र, दिव्या आपल्या मुद्द्यावर ठाम होती. तिने बिग बॉसची दिलगिरी व्यक्त केली, पण सदस्यांची माफी मागण्यास साफ नकार दिला. शिस्तीचा भंग आणि धमकी देणं या कारणास्तव बिग बॉसने तात्काळ निर्णय घेत दिव्याला थेट घराबाहेर काढलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Divya Shinde: 'एरव्ही संविधानाच्या गोष्टी करता...', BBM6 मध्ये पहिल्यांदाच दिसला बिग बॉसचा रुद्रावतार! दिव्याला झाप-झाप झापलं
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement