शरद पवार- पार्थ पवारांमध्ये 'गुजगोष्टी', रोहित पवारही चर्चेत सहभागी, 'पॉवर'फुल राजकारणाचं पुन्हा मनोमीलन?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
शरद पवार सलग तिसऱ्या दिवशी सहयोग बंगल्यावर गेले होते. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांनी शरद पवार यांच्याशी विशेष चर्चा केली.
advertisement
advertisement
राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची जोरदार चर्चा सुरू असताना आणि ही चर्चा दादा गटातील नेते फेटाळून लावत असताना तसेच सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली होती. परंतु संयमी शरद पवार यांनी बारामतीत तळ ठोकून, पवार कुटुंबातील सदस्यांशी सातत्याने संवाद साधून पुन्हा एकत्रि‍करणाची शक्यता बळावण्यासारखी परिस्थिती तयार केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
advertisement
गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या दादांच्या सहयोग बंगल्यावर जाऊन लोकांचे अभिवादन स्वीकारत आहेत. तिन्ही दिवशी त्यांनी पवार कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाची बोलणी अंतिम टप्प्यात आलेली असताना अजित पवार यांच्या अकाली मृत्यू झाल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यांच्या माघारी विलिनिकरण व्हावे, अशी आमची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसारच पवार कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांची बोलणी सुरू असल्याचे सांगितले जाते.
advertisement
बारामती येथील सहयोग या निवासस्थानी पार्थ पवार यांची भेट घेण्यासाठी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी पार्थ पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेट घेत संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेत मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीबाबत विचारांची देवाणघेवाण झाली.








