IND vs ENG : सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिला, आता 'हे' 5 ज्यूनिअर खेळाडू टीम इंडियात एंन्ट्री करणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
झिम्बाबेच्या हरारे स्पोर्टस क्लबच्या मैदानात पार पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कपर नाव कोरले आहे.
advertisement
advertisement
advertisement
पहिलं नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे. क्रिकेट वर्तुळात त्याने धुमाकुळ घालून ठेवला आहे. तसेच कुठलाच असा रेकॉर्ड उरला नाही आहे जो त्याने मोडला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून वैभव सूर्यवंशी आहे. वैभव सूर्यवंशीने या वर्ल्डकपमध्ये 439 धावा केल्या आहेत आणि सर्वाधिक धावा करण्यात तो दुसऱ्या स्थानी आहे. सध्याची त्याची कामगिरी पाहता त्याला कोणत्याही क्षणी भारताच्या सिनिअर संघात घेतले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
या टीममधला दुसरा खेळाडू म्हणजे आयुश म्हात्रे. ज्याप्रकारे भारताने आयुश म्हात्रेच्या नेतृत्वात हा वर्ल्ड कप जिंकला आहे.ते पाहता आयुशने खूप चांगली कॅप्टन्सी केली आहे. तसेच त्याने या वर्ल्डकपमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करून दाखवली होती.त्यामुळे सिनिअर संघात एन्ट्री करण्यासाठी तो चांगला दावेदार आहे.
advertisement
advertisement
advertisement









